एक्स्प्लोर

Shiv Sena UBT MLA Rajan Salvi : छापेमारीच्या कारवाईनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज पुन्हा एसीबीसमोर हजर; सातव्यांदा झाली चौकशी

Shiv Sena UBT MLA Rajan Salvi : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे सातव्यांदा चौकशीसाठी एसीबीसमोर हजर झाले.

Shiv Sena UBT MLA Rajan Salvi : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची आज पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशी केली. काही दिवसांपूर्वीच एसीबीने राजन साळवी यांच्या निवासस्थानी छापा मारला होता. त्यानंतर आज आमदार साळवी आणि त्यांच्या मोठ्या बंधूंची एसीबीने दोन तास चौकशी केली. 

शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी आज सातव्यांदा एसीबी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहिले.नोटीस बजावल्यानंतर आपल्या मोठ्या बंधूसह राजन साळवी यांची रत्नागिरी कार्यालयामध्ये दोन तास चौकशी करण्यात आली. 

राजन साळवी यांनी चौकशीनंतर काय म्हटले?

आमदार राजन साळवी यांनी सांगितले की, लाचलूचपत विभागाने माझ्या बंधूशी संबंधित व्यवसायाची काही माहिती मागवली आहे. ती त्यांना आम्ही आठवडाभरात देणार आहोत असे साळवी यांनी म्हटले. 

काही दिवसांपूर्वी झाडाझडती आणि चौकशी

काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर एसीबीने झाडाझडती घेतली होती. त्यावेळी त्यांची काही तास चौकशीही करण्यात आली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या बँक खात्याचीही तपासणी करण्यात आली. 

या सरकारला मला अटक करायचीच आहे, मला आरोपी बनवायचंच आहे असं सांगत आपल्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप आमदार साळवी यांनी केला. 

शिंदे गटात जात नाही म्हणून कारवाई

ज्या दिवशी एकनाथ शिंदे 40 आमदारांना फोडून गेले, तेव्हापासून मी शिंदे गटात जाणार अशी अफवा उठवली जात आहे, पण मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. राजन साळवी हा कोकणातील लढवय्या आमदार आहे. राजन साळवी शरण जाणार नाही, तो आपल्यासोबत येत नाही म्हणून सरकारचे हे कृत्य आहे असा आरोपही त्यांनी केला. 

काय आहे राजन साळवी यांच्यावर आरोप?

ऑक्टोबर 2009 ते २ डिसेंबर 2022 पर्यंत 14 वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवींवर ठेवण्यात आला आहे. साळवी यांच्याकडे 3 कोटी 53 लाख इतकी या बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रुपये इतकी आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा हा 118 टक्के इतका जास्त असल्याचा आरोप आहे. 

यापूर्वी राजन साळवी यांनी सहा वेळा एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयामध्ये हजर लावली होती. तसेच त्यांचा भाऊ, पुतण्या, वहिनी, स्वीय सहाय्यक यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. एसीबीने राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget