कोकण रेल्वेने गणेशोत्सवाच्या सिझनचं बुकिंग सुरु केलं अन् अवघ्या 63 सेकंदात तिकीट संपली
गणेशोत्वाच्या काळात कोकणात जाण्यासाठी रेल्वेची वेटिंग लिस्ट 500 च्या पार गेली आहे. यंदा गणेशोत्सवाला 7 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.
मुंबई : कोकणातील (Kokan News) सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. अवघ्या 63 सेंकदात प्रतीक्षा यादी पाचशे पार गेली आहे सर्व गाड्या एका मिनिटांत आरक्षित झाल्या. यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप केला आहे. यंदा 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधी म्हणजे 4 सप्टेंबर रोजीचे आरक्षण 7 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरू झालं. यानंतर केवळ 63 सेकंदांनी कोकणकन्या एक्स्प्रेसची वेटिंग लिस्ट 580 च्या पार गेली. कोकणात जाणाऱ्या अन्य ट्रेन्सचं बुकिंगही फुल्ल झालं आहे.
गणेशोत्वाच्या काळात कोकणात जाण्यासाठी रेल्वेची वेटिंग लिस्ट 500 च्या पार गेली आहे. यंदा गणेशोत्सवाला 7 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यानिमित्ताने आधीच्या 120 दिवसांपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरू झाली होती. कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या 63 सेकंदात 500 पार गेली होती. गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा निर्धार केलेले हजारो चाकरमानी तीन महिने अधिपासूनच गावी जाण्या-येण्याचे नियोजन करत असतात. त्यासाठी रात्रभर जागून कोकण रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.
पहिल्याच दिवशी अवघ्या 63 सेकंदात आरक्षण फुल्ल
लाडक्या बाप्पाचे 7 सप्टेंबरला आगमन होणार आहे. त्याआधीच्या किमान दोन दिवसांचे म्हणजे 5 सप्टेंबरचे या प्रवसाच्या तारखेचे 120 दिवस आधीचे आरक्षण खुले झाले. मात्र पहिल्याच दिवशी अवघ्या 63 सेकंदात आरक्षण फुल्ल झाले . त्यामुळे प्रवाशांकडून गैरप्रकारांचा आरोप करण्यात येत आहे. दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या समस्येला सामोरे जावे लागते.
गणेशोत्सवात चढ्या दराने तिकिट विक्री करण्याचे रॅकेट
कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव हे दोन सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे शहरी भागातला चाकरमानी हा हमखास आपली कामं सोडून किंवा कामावरच्या सुट्ट्या घेऊन तो गणपतीला आणि शिमग्याला हजेरी लावतो. रेल्वे तिकीटाची अवैध विक्री करणारे दलाल मोठ्या संख्येने तिकीटांचे आरक्षण करुन ते चढ्या दराने विक्री करत असल्याचा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करुन चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवातील रेल्वे तिकिटांचा काळाबाजार समोर आला होता.
हे ही वाचा :
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना बनवा धार्मिक, संस्कारी! भारतीय रेल्वेचे भारी पॅकेज, कमी बजेटमध्ये फिरा ही धार्मिक ठिकाणं