एक्स्प्लोर

गणेशोत्सवात 7, 12 अन् 17 सप्टेंबरला मद्यविक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर, अन्यथा कारवाई

जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी सणासुदीच्या, गणेशोत्सवाच्या काळात तीन दिवस मद्यविक्रीला बंदी घातली  आहे.

रत्नागिरी: सर्वांचा लाडका बाप्पा म्हणजेच गणेशोत्सव सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, घरोघरी गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी जल्लोषात सुरू असून गणेश मंडळेही बाप्पांच्या स्वागतामध्ये व्यस्त झाले आहेत. मंडपाची सजावट, देखावे, प्रसाद आणि मिरवणुकीची तयारीही जोरात सुरू झाली आहे. त्यातच, गणेशोत्सव काळात काही भाविक भक्त मांसाहार व मद्यसेवन वर्ज्य करतात. मात्र, आता गणेशोत्सव काळात दारु पिऊन धिंगाणा होऊ नये, किंवा दारु हे कुठल्याही अनुचित प्रकाराचे कारण ठरु नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क दारुबंदीचे आदेशच काढले आहेत. त्यानुसार,  गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी म्हणजे शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी दिनी रत्नागिरी जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली आहे

जिल्हाधिकारी (Collector) एम.देवेंदर सिंह यांनी सणासुदीच्या, गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळात तीन दिवस मद्यविक्रीला (Liquor) बंदी घातली  आहे. त्यानुसार, शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी दिनी, गुरुवार 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन आणि मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर ते  17 सप्टेंबर 2024 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन जिल्हाधिकारी सिंह यांनी  शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी, गुरुवार 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन, मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपुर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जारी केले आहेत. 

निर्णयाचे स्वागत, अन्यथा कारवाई

या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून, यामधे कसूर केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे, गणेश मिरवणुकीत मद्यपींचा दारु पिऊन होणारा डान्स टळणार आहे. तर, जिल्ह्यात कुठेही दारुची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्यास दुकानदारांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव सणाची सर्वांनाच उत्सुकता असते, हिंदू धर्मात मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण साजरा करतात. मात्र, या उत्सवातील मिरवणुकीत काही अनुचित प्रकार घडल्यास सणाला गालबोट लागते. त्यामुळे, जिल्हाधिकारी सिंह यांनी घेतलेल्या निर्णयाचे जिल्हाभरातील गणेशभक्तांकडून स्वागत केलं जात आहे. 

हेही वाचा

लाडक्या भावांच्या खात्यातही पैसे जमा होणार, तारीख ठरली; आत्तापर्यंत 2 लाख युवकांची नोंदणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी अजितदादांचं अमित शाहांना साकडं? दिल्लीत गुप्तभेट, चर्चांना उधाण
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 09 Jan 2025 : Maharashtra PoliticsTop 100 Headlines : 6 AM : 09 Jan 2024 : टॉप शंभर बातम्या : Superfast News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : 6.30 AM : 09 January 2025 : माझं गाव, माझा जिल्हा : ABP MajhaSpecial Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी अजितदादांचं अमित शाहांना साकडं? दिल्लीत गुप्तभेट, चर्चांना उधाण
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Embed widget