नोकरी आणि उद्योगात डावललं! कोका कोला कंपनीच्या विरोधात खेडमध्ये भूमिपुत्र आक्रमक, मंत्री उदय सामंत यांच्यावरही आरोप
खेडमध्ये कोका कोला कंपनीच्या विरोधात भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. या कंपनीला टाळे ठोकण्याचा इशारा स्थानिक लोकांनी दिला आहे.
Ratnagiri Khed Coca Cola Company : खेडमध्ये कोका कोला कंपनीच्या विरोधात भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. या कंपनीला टाळे ठोकण्याचा इशारा स्थानिक लोकांनी दिला आहे. स्थानिकांना नोकरी आणि उद्योगात डावलले जात असल्याचा आरोप पंचक्रोशीतील नागरिकांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आश्वासने कंपनी पाळत नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्थानिकांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे.
खेडमध्ये कोका कोला कंपनीच्या विरोधात भूमिपुत्र विकास समिती रस्त्यावर उतरली आहे. 26 जानेवारी पर्यंत कंपनीने दखल न घेतल्यास कंपनीला टाळे ठोकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. संतप्त नगिरकांचा कोका कोला कंपनीच्या विरोधात उद्रेक झाला आहेय संघर्ष समितीचे असंख्य कार्यकर्ते कोका कोला कंपनीच्या गेटवर एकत्र जमले आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्थानिकांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे.
कोकाकोला कंपनीच्या विरोधातील स्थानिक ग्रामस्थ चांगलेच आक्रमक
कोकाकोला कंपनीच्या विरोधातील स्थानिक ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत. या कंपनीचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. स्थानिकांच्या सगळ्या मान्य मान्य केल्या जातील असा शब्द उदय सामंत यांनी दिला होता. कंपनीने देखील स्थानिकांना प्राधान्य देऊ असे म्हटले होते. मात्र, अद्याप स्थानिक लोकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत, त्यामुळं नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहे. याठिकाणी जोरकदार घोषणाबाजी देखील केल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
उबाठात काय चाललंय हे जनतेला अन् आम्हालाही कळेना' उदय सामंत म्हणाले, 'योग्य वळणावर येतील की नाही...