Railway : पुणे, मुंबई, नागपूरसह कोल्हापुरसाठी एकही दिवाळी स्पेशल ट्रेन अद्याप सुरू नाही; रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा मराठवाड्यावर अन्याय
Marathwada Railway : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलीय. असे असताना मराठवाड्यावर पुनः एकदा दक्षिण मध्य आणि मध्य रेल्वेने अन्याय केलाय.

Marathwada Railway : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलीय. असे असताना मराठवाड्यावर पुनः एकदा दक्षिण मध्य आणि मध्य रेल्वेने अन्याय केलाय. नांदेड, परभणी असो किंवा छत्रपती संभाजीनगर इथून पुणे (Pune) कोल्हापूर (Kolhapur), नागपूर (Nagpur) अशी एकही दिवाळी स्पेशन ट्रेन (Diwali Special Train) सुरू करण्यात आली नाही. ज्यामुळे तिकडून इकडे येणाऱ्या आणि इकडून तिकडे जाणाऱ्या प्रवाशांना खाजगी वाहन, ट्रॅव्हेल्स ने ये-जा करावी लागतेय. त्यात ट्रॅव्हेल्स चालकांनी आपले दर वाढवले आहेत. ज्याने प्रवाश्यांची लूट होत आहे. अगोदरच अतिवृष्टीने आणि पुराने मराठवाड्यातील (Marathwada Rain) शेतकरी पुरता उध्वस्त झालाय आणि आता दिवाळीला पश्चिम महाराष्ट्र, नागपूर आदी विभागात शिक्षण नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी व इतर प्रवश्यांनी यायचे कसे? असा प्रश्न या निमित्याने निर्माण झालाय. त्यामुळे तत्काळ नांदेड, पुणे, कोल्हापुर, नागपूर अशा दिवाळी स्पेशल रेल्वे सोडण्याची मागणी रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे.
Marathwada Railway : नेमके ट्राव्हेलचे किती दर वाढलेत?
मराठवाड्यातून नांदेड-पुणे आणि नांदेड-पनवेल या दोनच गाड्यां आहेत. मात्र या गाड्यांचे बुकिंग 15 ते 23 ऑक्टोबर दरम्यान फुल आहे. या गाड्यांचे स्लीपरचे दर 350 आणि एसीचे दर 800 ते 1000 आहेत. तर ट्रॅव्हेलचे दर पुणे-परभणी 2200 ते 2500 सध्या हे दर असून आगामी काळात ते अजून वाढतात. नागपूरहुन मराठवाडा सुरु असलेली एकमेव नंदीग्राम ट्रेन ही बंद आहे. कोल्हापूर आणि कोकणासाठी एकही रेल्वे नाही. मुंबईहून नागपूरला जाणारी नंदीग्राम सुरू आहे, पण नागपूर ऐवजी बल्लारशाह अशी वळवण्यात आली आहे. दरम्यान यावर तोडगा म्हणून दिवाळी स्पेशल ट्रेन सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर न येता सांगितले आहे. त्यामुळे हि रेल्वे नेमकी कधी सुरु होते, आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवास कसा सोयीचा होतो, यासाठी रेल्वे प्रशासन नेमकं काय पाऊले उचलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Pratap Sarnaik : पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची कुटुंबासह पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी
धाराशिवची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कुटुंबासह पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली. महापुरात पाण्याच्या विळख्यात अडकलेल्या गावाला सरनाईक यांनी भेट दिली होती. भूम तालुक्यातील त्याच साडेसांगवी गावात कुटुंबासह जात सरनाईक यांनी गावकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. पत्नी मुलं सुना नातवंड असं परिवारासह सरनाईक साडेसांगवीत पोहोचले. यावेळी गावकऱ्यांना दिवाळीसाठी आकाश कंदील फटाके दिवाळीचे किट वाटप करण्यात आलं. सोबतच गावातील प्रत्येक कुटुंबाला पाच हजारांची मदतही देण्यात आली.
भविष्यात गावाला पुराचा धोका उद्भवू नये यासाठी दोन पुलांची उंची वाढवण्यासाठी सूचना करण्यात आल्या. तसेच दोन पूल आणि गावाला जोडणारा रस्त्याच्या कामाचंही भूमिपूजन करण्यात आलं. पुढील पावसाळ्या अगोदर हे सर्व काम पूर्ण होईल असा शब्द यावेळी पालकमंत्र्यांनी गावकऱ्यांना दिला. ही दिवाळी कायम आमच्या लक्षात राहील. माझ्या कुटुंबाप्रमाणेच गावकऱ्यांची दिवाळी व्हावी म्हणून भेट दिल्याचं सरनाईक म्हणाले. प्रताप सरनाईक यांच्या पत्नी यांनीही गावकऱ्याबरोबर दिवाळी साजरी करत आनंद व्यक्त केला.
संबंधित बातमी:
























