एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : "तुम्ही देव मानत असाल, तर माना, पण मोदींची छत्रपतींशी तुलना करणारे बिनडोक"; उद्धव ठाकरेंचा गोविंदगिरी महाराजांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करत असेल तर ते निर्बुद्ध, बिनडोक आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोविंदगिरी महाराजांवर केला आहे.

Uddhav Thackeray : राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारले गेले याचा आनंद आहे. राम मोदींची प्रॉपर्टी नाही. या सोहळ्यामध्ये एक निर्बुद्ध मोदींना देव मानत असेल. मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करत असेल तर ते निर्बुद्धच आहे. ते कोणी असू द्यात, ते निर्बुद्ध आहेत, बिनडोक आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गोविंदगिरी महाराजांवर (Govindgiri Maharaj) केला आहे. उद्धव ठाकरे हे दोन दिवस रायगड दौऱ्यावर आहेत. पेण येथे त्यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, हे सरकार मणिपूरमध्ये जात नाही. बोलायला तयार नाहीत. गिते आपला पराभव मागच्या वेळेस झाला. मोदी लाट असताना येथे विरोधातला उमेदवार निवडून आला होता. ४०० पार ते म्हणताय मग नितीश कुमार तुम्हाला का लागले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही लढाई

मोदी गॅरेंटी हे म्हणताय. हेमंत सोरेन यांना अटक आणि अजित पवार यांना क्लीन चिट, ही मोदी गॅरेंटी आहे. नितीश कुमार त्यांच्यासोबत गेले. दुसऱ्या दिवशी तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांना ईडीचे समन्स आले ही ही मोदी गॅरेंटी आहे. ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही लढाई आहे. 

मी पंतप्रधान म्हणून स्वप्न पाहायचं नाही का?

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, गिते यांनी पंचायत केली. त्यांनी सांगितले की, आता मी पुन्हा मुख्यमंत्री होईल म्हणजे मी पंतप्रधान म्हणून स्वप्न पाहायचं नाही का?  असो, मला असे स्वप्न पडत नाही. ना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडले ना पंतप्रधान पदाचे. येथे सुद्धा गद्दारांची घराणेशाही आहे. रायगडमध्ये पवार साहेब मला आधी एका कार्यक्रमात बोलले होते की, या गद्दाराला गाडावं लागेल, असे ते म्हणाले. 

ही भाड्याने आणलेली जनता नाही

मोदी यांच्या थापा तुम्ही लोकांना सांगा, प्रचंड पैसा जाहिरातीवर खर्च केला आहे. जनसंवाद माझा नाही तुम्ही एकमेकात संवाद करा आणि जनतेसमोर सत्य येऊ द्या. सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी आता तुमची आहे, असे ते अनंत गीते यांना म्हणाले. ही भाड्याने आणलेली जनता नाही, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

आणखी वाचा

Uddhav Thackeray : "अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार", उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मदतफेरीतून जमवले 43 लाख; देशमुख कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
मदतफेरीतून जमवले 43 लाख; देशमुख कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'त्या' बहिणींना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार, नेमका निकष काय?
लाडकी बहीण योजनेच्या जीआरमधील 'ती' महत्त्वाची अट, बहिणींना पडताळणीनंतर 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार
Bajrang Sonawane : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Murlidhar Mohol on Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरु होणारChandrashekhar Bawankule : Saamana तून फडणवीसांचे कौतुक;चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले आभारBharat Gogawale : मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 3 PM 03 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मदतफेरीतून जमवले 43 लाख; देशमुख कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
मदतफेरीतून जमवले 43 लाख; देशमुख कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'त्या' बहिणींना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार, नेमका निकष काय?
लाडकी बहीण योजनेच्या जीआरमधील 'ती' महत्त्वाची अट, बहिणींना पडताळणीनंतर 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार
Bajrang Sonawane : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
आधी बीडच्या मोर्चात, पुन्हा मुख्यमत्र्यांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचे खास आमदार मोठं बोलले
आधी बीडच्या मोर्चात, पुन्हा मुख्यमत्र्यांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचे खास आमदार मोठं बोलले
NCP : राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
Suresh Dhas : कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
Dmart Share Price : डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?
डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?
Embed widget