Mahendra Dalvi: शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींच्या गाडीचा अपघात, धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Raigad Car Accident: महेंद्र दळवी हे मुरुड -अलिबाग मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शनिवारी मुरुड- नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते.
![Mahendra Dalvi: शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींच्या गाडीचा अपघात, धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू Shivsena Shinde Camp MLA Mahendra Dalvi car accident collision with bike one died Mahendra Dalvi: शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींच्या गाडीचा अपघात, धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/02/491f88833ab272dd98cc03aca4cc86321709403319295954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रायगड: शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीचा शनिवारी भीषण अपघात झाला. त्यांची कारची आणि दुचाकीची जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मुरुड आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी गावाजवळ हा अपघात घडला. या घटनेनंतर महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांच्या गाडीच्या चालकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र दळवी हे मुरुड -अलिबाग मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शनिवारी मुरुड- नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी उसडी गावानजीकच्या टोलनाक्याच्या परिसरात महेंद्र दळवी यांची गाडी आणि जासीम अब्दुल रहेमान पासवारे या व्यक्तीच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. यामध्ये जासीम अब्दुल रहेमान पासवारे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत फारसा तपशील अजून समोर आलेला नाही. पोलिसांनी सध्या महेंद्र दळवी यांच्या गाडीच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)