एक्स्प्लोर

Raigad Police Recruitment : पोलीस भरतीसाठी आलेल्या तीन उमेदवारांकडे आढळली उत्तेजक द्रव्ये, रायगडमधील धक्कादायक घटना

Raigad Police Recruitment : रायगड इथे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य आढळली आहेत. या तिन्ही उमेदवारांच्या रक्ताचे नमुने मुंबई आणि नवी मुंबई इथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Raigad Police Recruitment : राज्यातील बहुप्रतीक्षित पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. भरतीसाठी मैदानी चाचणी (Physical Efficiency Test) सुरु आहे. परंतु या मैदानी चाचणी सुरु असतानाच रायगडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगड इथे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य आढळली आहेत. या तिन्ही उमेदवारांच्या रक्ताचे नमुने मुंबई आणि नवी मुंबई इथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

रायगड इथे पोलीस भरतीसाठी सध्या मैदानी चाचणी सुरु आहे. या चाचणीदरम्यान तीन उमेदवारांकडे उत्तजेक द्रव्य असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर या तिघांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे न्यूरोकाइंड गोल्ड इंजेक्शन, पाम ओमेगा व्हीआयटी सिई टॅब्लेटस, औषधी द्रव्याच्या तीन काचेच्या बाटल्या पोलिसांना आढळल्या. 

रक्ताचे नमुने मुंबई आणि नवी मुंबईला तपासणीसाठी पाठवले

हे तिन्ही उमेदवार पुणे आणि अहमदनगर इथून रायगडमध्ये पोलीस भरतीसाठी आले होते. वरसोली इथल्या कॉटेजमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. या उमेदवारांकडे  
न्यूरोकाइंड गोल्ड इंजेक्शन, पाम ओमेगा व्हीआयटी सिई टॅब्लेटस, औषधी द्रव्याच्या तीन काचेच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहे. तिन्ही उमेदवारांचे रक्ताचे नमुने मुंबई आणि नवी मुंबई इथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरती

महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. त्यासाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरातून सुमारे 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. त्यानुसार, 2 जानेवारीपासून पोलीस भरतीच्या शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे.

कोणकोणत्या तारखेला शारीरिक चाचणी?

2 ते 4 जानेवारीपर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी तर 5 जानेवारीला महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. 6 ते 14 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. तर 15 ते 17 जानेवारीपर्यंत पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. रविवारचा दिवस वगळून ही चाचणी होणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा

Kolhapur Police : बेरोजगारीचे भीषण वास्तव; कोल्हापुरातही पोलीस शिपाई होण्यासाठी डाॅक्टर, इंजिनिअरसुद्धा रांगेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Loksabha : संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Gorai : नो वॉटर, नो व्होट गोराईतील गावकऱ्यांचा नारा; अनेक वर्षांपासून पाण्याची समस्याSpecial Report Eknath Khadse :  नाथाभाऊंची घरवापसी का रखडली? भाजपच्या स्थानिक नेत्यांचा खोडा ?Special Report Congress Sangli  : क्राँग्रेसला सांगलीची सल, विश्वजीत कदमांनी बोलून दाखवली खदखदLok Sabha : आघाडी आणि महायुतीच्या जागांवरील उमेदवारांची घोषणा बाकी नेमका घोळ काय ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Loksabha : संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
भारताची चिंता वाढली! पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसला चीन, सियाचीन ग्लेशियरजवळ बेकायदेशीर रस्ते बांधकाम, सॅटेलाइट फोटो समोर
भारताची चिंता वाढली! पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून रस्ते बांधकाम, सॅटेलाइट फोटो समोर
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
वाशी APMC संचालकाच्या अटकेनंतर इतरांवर अटकेची टांगती तलवार, निवडणुकीच्या तोंडावर कारवाई
वाशी APMC संचालकाच्या अटकेनंतर इतरांवर अटकेची टांगती तलवार, निवडणुकीच्या तोंडावर कारवाई
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
Embed widget