एक्स्प्लोर

Raigad Lok Sabha Result 2024 : सुनिल तटकरे रायगडमधून विजयी, अनंत गीतेंचा सलग दुसऱ्यांदा पराभव

Raigad Lok Sabha Election Result 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघातील लढत तुल्यबळ मानली जात होती. या मतदारसंघात सुनिल तटकरे हे विजयी झालेत. त्यांनी अनंत गीते यांचा पराभव केलाय. 

Raigad Lok Sabha Result 2024 : रायगड लोकसभा (Raigad Lok Sabha) मतदारसंघातील लढत तुल्यबळ मानली जात होती. अखेर रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनिल तटकरे (Sunil Tatkare) हे विजयी झाले आहे. तटकरे हे 82 हजार 784  हून अधिक मतांनी सुनिल तटकरे विजयी झाले आहेत. सुरुवातीपासून तटकरे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं होतं.  तर शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते (Anant Gite) हे पिछाडीवर होते. सुनिल तटकरे यांनी सलग दुसऱ्यांदा अनंत गीतेंचा परभाव केला आहे, हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. 

यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघातून मैदान तेच आणि उमेदवारही तेच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनिल तटकरे (Sunil Tatkare) हे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनंत गीते (Anant Gite) हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. या मतदारसंघात दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. अनेक दिग्गज नेत्यांना या मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या होत्या. अखेर सुनिल तटकरे यांनीच रायगडचे मैदान मारलं आहे.

रायगड लोकसभा निकाल 2024 (Raigad Lok Sabha Election Result 2024) (

उमेदवाराचे नाव  -                      पक्ष                                          -विजयी उमेदवार

सुनिल तटकरे   -                राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट            सुनिल तटकरे
अनंत गीते  -                      शिवसेना उद्धव ठाकरे गट 

रायगड लोकसभा मतदारसंघात 58.10 टक्के मतदान (Raigad Lok Sabha Voting Percentage 2024) 

दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघात यावेळी मतदान घटलं आहे. यावेळी 58.10 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2019 च्या तुलनेत हे मतदान 7 टक्के कमी आहे. 2019 ला या मतदार संघात 65.06 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे कमी झालेला मतदानाचा टक्का कोणाच्या फायद्याचा आणि कोणाच्या तोट्याचा याची चर्चा मतदार संघात सुरू आहे.

रायगड लोकसभेत रायगडमधील चार तर रत्नागिरीमधील दोन मतदारसंघाचा समावेश

रायगड लोकसभेत रायगडमधील पेण,अलिबाग,श्रीवर्धन आणि महाड हे चार मतदार संघ येतात. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोपोली आणि गुहागर हे मतदार संघांचा समावेश होतो. या मतदारसंघात कोणाचं प्राबल्य आहे. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

पेण विधानसभा मतदारसंघ -          रवी पाटील  -   भाजप
अलिबाग विधानसभा मतदारसंघ -   महेंद्र दळवी   - शिवसेना शिंदे गट
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ -      अदिती तटकरे - राष्ट्रवादी अजित पवार गट
महाड विधानसभा मतदारसंघ -        भरत गोगावले -  शिवसेना शिंदे गट
दापोली विधानसभा मतदारसंघ -       योगेश कदम  -   शिवसेना शिंदे गट
गुहागर विधानसभा मतदारसंघ -        भास्कर जाधव -  शिवसेना ठाकरे गट

महायुतीच्या ताब्यात पाच मतदार संघ आहे. तर आघाडीच्या ताब्यात एकच मतदार संघ आहे. त्यामुळं या मतदारसंघात महायुतीचं प्राबल्य असल्याचं पाहायला मिळच आहे. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काय झालं?

2014 साली गिते यांनी सुनिल तटकरे यांचा निसटता पराभव केला होता. हा पराभव तटकरेंच्या जिव्हारी लागला होता. अगदी शेवटच्या फेरीपर्यंत तटकरे यांनी गितेंना टक्कर दिली होती. अखेर दोन हजाराच्या फरकाने त्यांना पराभव स्विकारावा लागला. विशेष म्हणजे या निवडणुकीत सुनिल तटकरे नावाच्या अजून एका उमेदवाराला दहा हजाराच्या घरात मतदान झाले होते. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गीते यांचा तटकरे यांनी दणदणीत पराभव करत मागिल पराभवाची परतफेड केली होती. या निवडणुकीत तटकरेंनी 4,86,968 मते घेतली होती. तर अनंत गीतेंनी 4,55,530 मते घेतली होती. जवळपास 31 हजार मतांच्या फरकाने सुनिल तटकरे विजयी झाले होते. यावेळी नेमकं कोण विजयी होणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. 

रायगड लोकसभा मतदारसंघाची पार्श्वभूमी

रायगड लोकसभा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदार संघ 2008 साली अस्तित्वात आला. येथे 2009 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली होती. रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती. येथेच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. रायगड लोकसभा क्षेत्रातील अलिबागला सुंदर समुद्र किनारा आहे.  पेण परिसरातील शाडूच्या गणपती मूर्ती जगभरात प्रसिद्ध आहेत. 

सलग दोन वेळा शिवसेनेचा खासदार

रायगड लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये कुलाबा लोकसभा मतदारसंघातून वेगळा झाला. या मतदार संघात 2009 मध्ये पहिल्यांदाच निवडणूक झाली. 15 लाख 32 हजारांहून अधिक मतदार असलेली ही जागा शिवसेनेने दोनदा काबीज केली आहे. शिवसेनेने येथे पहिली आणि दुसरी निवडणूक जिंकली होती. रायगड लोकसभा मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे खासदार आहेत. सलग दोनवेळा या मतदारसंघातून खासदार राहिलेले अनंत गीते यांचा त्यांनी पराभव केला होता. रायगड लोकसभा जागेवर 2009 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत झाली होती. या जागेवरून काँग्रेसने ए. आर. अंतुले तर शिवसेनेने अनंत गीते यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत अनंत गीते यांना 4,13,546 मते मिळाली. त्यांनी ही निवडणूक 1,46,521 मतांनी जिंकली. तर काँग्रेसचे ए.आर. अंतुले यांना 2,67,025 मते मिळाली. 2014 च्या निवडणुकीतही शिवसेनेने अनंत गीते यांना तिकीट देऊन पुन्हा विजयाची पुनरावृत्ती केली. त्यांनी सुनिल तटकरे यांचा पराभव केला. 2019 च्या निवडणुकीत मात्र, सुनिल तटकरे यांनी पराभवाचा वचपा काढला. त्यांनी अनंत गीतेंचा पराभव केला.  

महत्वाच्या बातम्या:

Raigad loksabha election Exit poll : कोण सर करणार 'रायगड'? गीते की तटकरे? एक्झिट पोलमध्ये धक्कादायक अंदाज

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदीPankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Embed widget