धक्कादायक! दरवाजात बसण्यावरुन वाद, धावत्या रेल्वेमधून एकाला फेकलं गाडीबाहेर, उपचारादरम्यान प्रवाशाचा मृत्यू
रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या रेल्वेमधून एका प्रवाशाला गाडीबाहेर फेकल्याची घटना घडली आहे. दरवाज्यात बसण्याच्या वादातून दोन प्रवाशामध्ये वाद झाला.
Raigad Crime news : रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या रेल्वेमधून एका प्रवाशाला गाडीबाहेर फेकल्याची घटना घडली आहे. दरवाज्यात बसण्याच्या वादातून दोन प्रवाशामध्ये वाद झाला. या वादातूनच एका प्रवाशाला धावत्या रेल्वेमधून बाहेर फेकण्यात आलं आहे. या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. आरोपीला कर्जत रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मध्य रेल्वेच्या कर्जत भिवपुरी स्थानकादरम्यान कोणार्क भुवनेश्वर एक्सप्रेस मधून बसण्याच्या वादातून झालेल्या भानगडीचा राग टोकाला जाऊन एका प्रवाशाने थेट समोरील प्रवाशाला लाथ मारून एक्सप्रेस बाहेर फेकल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कर्जत रेल्वे पोलिसांनी आरोपीला ठाणे रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. मंगेश दसोरे राहणार अकोला अस या आरोपीचे नाव समोर आले आहे.
दरवाजात बसण्यावरुन झाला वाद
आरोपी मंगेश दसोरे हा पुणे मुंबई असा या रेल्वेने प्रवास करत होता. त्याचवेळी विनोद कांबळे आणि त्याचा मित्र मुंबई दर्शन करण्यासाठी जात असताना दरवाजात बसण्यावरुन त्यांचा वाद झाला आणि या रागाच्या भरात आरोपी मंगेशने विनोदच्या छातीत लाथ मारून त्याला गाडी बाहेर फेकले. ही घटना आज घडली. जखमी अवस्थेत विनोदला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान विनोदचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. अधिक तपास कर्जत रेल्वे पोलिस करत आहेत.























