Panvel Vidhansabha Election 2024: पनवेल विधानसभेतून पुन्हा प्रशांत ठाकूर यांनी मारली बाजी
Panvel Vidhansabha Election 2024: पनवेल विधानसभेतून प्रशांत ठाकूर यांनी बाजी मारली आहे.
Maharashtra Vidhansabha Election 2024: पनवेल विधानसभा मतदारसंघात (Panvel Assembly Constituency) पुन्हा भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी विजय मिळवला आहे. प्रशांत ठाकूर यांनी 51 हजार 091 मतांनी विजय मिळवला. प्रशांत ठाकूर यांनी महाविकास आघाडीच्या लिना लाड यांचा पराभव केला.
महायुतीने पनवेलचे विधानसभा मतदारसंघाचे (Panvel Vidhansabha Election 2024) अधिकृत उमेदवार म्हणून प्रशांत ठाकूर यांचे नाव जाहीर केलेले नाही. तरीही ठाकूर यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष या घटक पक्षांमध्ये आपसांत रस्सीखेच सुरू आहे. तर मनसेकडून योगेश चिले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवी मुंबईतील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. दरम्यान, विशेषत: प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न मागील 25 वर्षांपासून जैसे थे आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं?
पनवेल विधानसभा मतदारसंघ हा मावळ लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे प्रशांत ठाकूर 1,79,109 मते मिळवून विजयी झाले.भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष पक्षाचे हरेष मनोहर केनी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने पनवेल सर्वात मोठे शहर-
खारघर, उलवे नोड, नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी, तळोजा, कामोठे आणि कळंबोली नोड्स तसेच उरण शहर आणि त्याचे बंदर, जेएनपीटी यांचा समावेश असलेल्या नवी मुंबईच्या नियोजित महानगरात जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग समाविष्ट आहे. रायगड जिल्ह्यात खारघर, तळोजा, कळंबोली, पनवेल, रसायनी, कर्जत, खोपोली, माथेरान, उरण, पेण, अलिबाग, मुरुड-जंजिरा, रोहा, नागोठणे, सुधागड-पाली, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, बिरवाडी या शहरांचा समावेश होतो. पोलादपूर. लोकसंख्या, औद्योगिकीकरण तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे शहर पनवेल आहे.
रायगड जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व-
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांचा विजय झाला. तर ठाकरे गटाचे नितीन गिते यांना पराभवाचा सामना करावा लागला. रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 3, भाजप 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि अपक्ष 1 उमेदवार विजयी झाले होते. सध्याचा विचार केल्यास रायगड जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व असल्याचे दिसून येतंय. कारण शिवसेनेचे तीनही आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. तर अदिती तटकरे देखील महायुतीचा भाग असलेल्या अजित पवार गटासोबत आहेत.