एक्स्प्लोर

Mumbai-Goa Highway Accident : कोकणासाठी गुरुवार ठरला घातवार... रायगड आणि सिंधुदुर्गातील अपघातात 13 जणांचा मृत्यू

Maharashtra Accident News: भीषण अपघातांनी कोकण हादरलं. मुंबई-गोवा महामार्गावर रायगड आणि कणकवलीजवळ अपघातात तब्बल 13 जणांनी जीव गमावला.

आशिष घरत, अमोल मोरे, सदाशिव लाड; एबीपी माझा प्रतिनिधी 

Konkan Mumbai-Goa Highway Accident : कोकणासाठी (Konkan News) गुरुवार घातवार ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकापाठोपाठ एक अशा भीषण अपघातांनी (Accident News) कोकण हादरलं. सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये आज पहाटे झालेल्या दोन्ही अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे मुंबई-गोवा महामार्गावर रायगड (Raigad Accident) जवळील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली (Kankavali Accident News) वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात झाला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

रायगडमध्ये (Raigad) कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 9 प्रवासी जागीच गतप्राण 

पहिला अपघात रायगड जिल्ह्यात झाला. मुंबई-गोवा महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगडमधील माणगावजवळ रेपोली इथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही कार मुंबईहून गुहागरच्या दिशेने जात होती. दोनच्या सुमारात इको कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये पाच पुरुष आणि तीन महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. तर या अपघातात चार वर्षीय बालक बचावला आहे. दरम्यान, अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे.

कणकवलीत भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, तर 21 जखमी 

दुसरा अपघात हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली (Kankavali Accident) वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात झाला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गडनदी पुलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. अपघातग्रस्त खासगी आराम बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. बसमधून तब्बल 36 प्रवासी प्रवास करत होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, नऊ प्रवाशांचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Vision Worli : तुम्ही मुंबईचे मालक, रडता कशाला? राज ठाकरेंची कोळी बांधवांना सादTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 21 Sept 2024 : 6 PmAnandache Pan : आशाताईंच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणारं पुस्तक 'स्वरस्वामिनी आशा' : 21 Sep 2024Vare NIvadnukiche Superfast : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट : 21 सप्टेंबर 2024 : 6 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Rishabh Pant : रिषभ पंतनं केली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटीमध्ये गाठला मोठा टप्पा
रिषभ पंतकडून महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये गाठला टप्पा
Atishi CM मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Video : मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Tirupati Laddu Controversy : पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
Embed widget