Panvel Full Marathon : पनवेलमधील पहिल्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेची तारीख जाहीर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोगोचं अनावरण
Panvel First Full Marathon : पनवेल शहरात येत्या 1 डिसेंबर 2024 रोजी ही पूर्ण मॅरेथॉन म्हणजेच 42 किलोमीटरची स्पर्धा पार पडणार आहे.
First Full Marathon in Panvel : पनवेलमधील पहिल्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पनवेल शहरात येत्या 1 डिसेंबर 2024 रोजी ही पूर्ण मॅरेथॉन म्हणजेच 42 किलोमीटरची स्पर्धा पार पडणार आहे. मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं.
पनवेलमधील पहिल्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा
आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाषणात पनवेल शहराचं महत्त्व पटवून सांगताना, या मॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. यासोबतच खेळाडू तयार होण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित करण्याचं गरजेचं असल्याचं प्रशांत ठाकूर म्हणाले. तर डॉ. कल्याण पाटील यांनी मॅरेथॉनचं आणि धावण्याचं आरोग्य दृष्टीनं महत्त्व पटवून दिलं.
मॅरेथॉनसाठी रजिस्ट्रेशनसाठी नोंदणीही सुरु
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हे अनावरण न्यू पनवेलच्या स्पाईस वाडीत डिजिटल पद्धतीनं पार पडलं. याचवेळी मॅरेथॉनशी संबंधित वेबसाईटचं पेजचं प्रकाशन पार पडलं आणि रजिस्ट्रेशनसाठी नोंदणीही सुरु झाली.
ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार
या कार्यक्रमासाठी रनर अजित कंबोज, डॉ. कल्याणी पाटील हे उपस्थित होते. तर स्पर्धेचे आयोजक सुरेश रिसबूड, प्रफुल वाझे उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमार ठाकूर यांनी केलं. दरम्यान, या मॅरेथॉन स्पर्धेसाठी नोंदणी करायची असल्यास indiarunning आणि Townscript वर ऑनलाइन पद्धतीनं करता येईल.
आगामी काळात या स्पर्धेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम देखील राबवण्यात येणार आहेत, याची माहिती देखील वेळोवेळी देण्यात येईल असा आयोजकांनी सांगितला आहे.