एक्स्प्लोर

काम सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना उचलून आणून जेलमध्ये टाका, मनुष्यबळाचा गुन्हा नोंदवा, मुख्यमंत्री आक्रमक

Eknath Shinde : मुंबई गोवा महामार्गाचं काम अर्ध्यावर सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

रायगड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील उपस्थित आहेत. काम सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना उचलून आणून जेलमध्ये टाका, मनुष्यबळाचा गुन्हा नोंदवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्याची दुरावस्था पाहिल्यानंतर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरुन आदेश दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या महामार्गाची पाहणी करत आहेत. महामार्गाची कामं युद्धपातळीवर करा, असे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले. कामं सोडून गेलेल्या कंत्राटदारांना टर्मिनेटच करु नका तर काळ्या यादीत टाका. डिबार करुन टाका, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

कंत्राटदारांवर 302 प्रमाणं गुन्हा दाखल करा, इथं माणसं मरत आहेत, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी केला. कंत्राटदाराला नुसतं टर्मिनेट आणि दंड करुन उपयोग नाही त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन लावणार आहे. जे कंत्राटदार कामं सोडून पळून गेले आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. जे लोक कामं सोडून पळाले आहेत त्यांच्यामुळं माणसं मेली आहेत. कंत्राटदारांवर उद्या एफआयआर झाला पाहिजे. मला मोबाईलवर एफआयर पाठवायची, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या. 

जे कंत्राटदार काम सोडून पळाले त्यांना केवळ काळ्या यादीत टाकून उपयोग नाही. त्यांच्यामुळं माणसं मेली आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे  आदेश एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना  दिले. एकालाही सोडायचं नाही, उचलून आणा जेलमध्ये टाका,लोकं एवढे मेलेत त्याला हे जबाबदार आहेत. मला याचं रिपोर्टिंग करा, असं  एकनाथ शिंदे म्हणाले. जेलमध्ये टाकल्याशिवाय यांना धडा मिळणार नाही. ही मोगलाई आहे का? मेसेज एवढा कडक गेला पाहिजे, परत कोणी काम सोडणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी पळस्पे फाटा येथून मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील रखडलेल्या मुंबई गोवा हायवेच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आमदार भरत गोगावले देखील उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.  

एकनाथ शिंदे यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन 

संबंधित बातम्या :

गणपतीपूर्वी मुंबई- गोवा हायवेवरची वाहतूक सुरळीत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Speech Nashik | विकसित भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घ्यायला आलोय, मोदींनी नाशिकची सभा गाजवलीRaj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Embed widget