गणपतीपूर्वी मुंबई- गोवा हायवेवरची वाहतूक सुरळीत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
काहीही करून गणेशोत्सवपूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
रायगड : मुंबई- गोवा (Mumbai - Goa Highway) महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज स्वतः मैदानात उतरले आहेत. जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत ते मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. काहीही करून गणेशोत्सवपूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रेपीड क्विक सेटिंग हार्डनर ( एम -60 ) चा वापर करून हे खड्डे बुजवता येथील का याचाही आढावा त्यांनी आढावा घेतला.. खासदार श्रीरंग अप्पा बारणे,आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसेच एनएचएआयचे अधिकारी शिंदे यांच्यासोबत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गणपतीच्या निमित्ताने चाकरमान्यांना गावी जाताना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. जिओ पॉलिमरचा वापर करून प्रस्ताव बनवण्यात आला आहे . एम सिक्सटीन हा मॅटर आहे. तिसरा DLC च्या माध्यमातून काम करणार आहोत. प्रिकश M 16 ने काम करत आहे. पीडब्ल्यूडी अधिकारी आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने हा रस्ता लवकरात लवकर आम्ही नीट करत आहोत. कोणता रस्ता कशा पद्धतीने भरावा याचं अभ्यासही केला जात आहे.
मुंबई गोवा हायवेरील खड्डे नवीन टेक्नालॉजीने भरणार : मुख्यमंत्री
गणपती आधी रस्ते रस्ते खड्डे बघतो करण्याबाबत आम्ही विचार करू नका. गणपतीपुळे नवीन तंत्रज्ञानाने बनवलेल्या रस्त्यामुळे आपण चाकरमान्यांना या त्रासातून मुक्त करू... ज्यांनी चुकीचे काम केले आहे त्यामुळे भोगावे लागत आहे.. इथे एक खड्डा आहे जो नव्या तंत्रज्ञानाने भरता येते आहे. नितीन गडकरी स्वतः लक्ष ठेऊन आहेत. रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घातले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ठेकेदारांवर कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई- गोवा महामार्गावर लोकांचा त्रास पाहता ठेकेदारावर कठोर कारवाई करणार आहे. कोणाला पाठीशी घालणार नाही. अनेक अपघात झाले. काँट्रॅक्ट पहिले मातोश्रीवर घेतले जाते. आता त्यांच्याकडे कोणीच कॉन्ट्रॅक्टर जात नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
हे ही वाचा :