एक्स्प्लोर

Bharat Gogawale : आता माझ्या मंत्रिपदाची वेळ निघून गेली, पुढील सरकारमध्ये हा भरतशेठ मंत्री असणार; भरत गोगावलेंचा आशावाद

Bharat Gogawale : आपल्याला एसटी महामंडळ दिले असल्याची माहिती आहे, पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले. 

रायगड : आपल्या मंत्रिपदाची वेळ आता निघून गेली आहे, राहिलेल्या काही दिवसांसाठी आपल्याला कुणीही मंत्रिपद देऊ शकत नाही आणि कुणीही ते घेणार नाही. पण पुढच्या महायुती सरकारमध्ये मी मंत्री असणार हे निश्चित असं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं. आपल्याला आता एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आलं आहे, पण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मी पुढचा निर्णय घेणार असंही ते म्हणाले. 

शिंदे गटातील तिघांची महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामध्ये आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील आणि संजय शिरसाटांच्या नावाचा समावेश आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले यांनी हे वक्तव्य केलं. पहिल्या वेळी मंत्रिपदासाठी माझं नाव होतं, पण मी त्याला नकार दिला असं भरत गोगावले म्हणाले. 

नशिबात असणाऱ्या गोष्टी घडतात

भरत गोगावले म्हणाले की, शिवसेनेतील तिघांना महामंडळ मिळाले ही चांगली बाब आहे. त्या तिघांचेही मी अभिनंदन करतो. नशिबात असणाऱ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे नाराज होण्याचं काहीच कारण नाही. मंत्रिमंडळातील मंत्री किती आणि त्यांमधील लोक किती हे समजून आतापर्यंत आम्ही चालत आलो आहोत. निवडणुकीसाठी आता खूप कमी दिवस उरलेत.  येणाऱ्या 5 ऑगस्टला आचारसहिंता लागण्याची शक्यता आहे. 20 दिवसांसाठी मंत्रिपद कोणी घेऊ शकत नाही, कुणीच देऊ शकत नाही. 

मंत्रिपदाची वेळ टळून गेली

भरत गोगावले म्हणाले की, माझ्या मंत्रिपदाची वेळ आता टळून गेली आहे. माझ्या मंत्रिपदाचा विचार आता तरी होणार नाही. माझ्या मंत्रिपदाबाबत कोणतंच राजकरण नाही. पुढील 20 दिवसांत मला कोणीच मंत्रिपद देऊ शकत नाही. पुढच्या महायुतीच्या सरकारमध्ये भरतशेठ मंत्री असणार हे निश्चित.  

एसटी महामंडळ घ्यायचं की नाही ते ठरवू

शिंदे गटातील काही नेत्यांची महामंडळावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले म्हणाले की, आपलीही एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याची माहिती आहे. पण ते स्वीकारायचं की नाही त्यावर शिंदे साहेबांशी चर्चा करणार आणि मग निर्णय घेणार. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Votting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवरCM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
Embed widget