Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Maharashtra election Voting turnout: राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेला मतदानाचा टक्का वाढणार का, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सात वाजता सुरुवात झाली. आता मतदानाचे आठ तास उलटून गेले आहेत. मतदान प्रक्रिया संपण्यासाठी अवघे दोन तास शिल्लक राहिले आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यातील मतदानाचे चित्र पाहता पुन्हा एकदा लोकसभेइतकेच मतदान होईल, असे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांना अनेक अडचणी आल्या होत्या, त्यामुळे कमी मतदान झाले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) या त्रुटी सुधारत मतदान केंद्रांवर अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. शहरांमधील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, मतदानाची सध्याची टक्केवारी पाहता मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनीच लोकशाहीचा जास्त आब राखल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह जास्त दिसून येत आहे. नक्षलग्रस्त परिसर अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी धडाडीने मतदान करुन मतदानाची सर्वाधिक टक्केवारी नोंदवली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, आरमोरी आणि गडचिरोली या तीन मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. राज्यात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 45.53 टक्के मतदान झाले आहे. आता पुढील तीन तासांत मतदानाचा हा टक्का आणखी किती वाढणार, हे बघावे लागेल.
राज्यातील सर्वाधिक मतदान झालेले 30 मतदारसंघ खालीलप्रमाणे
अहेरी - 66.27
गडचिरोली - 62.43
अर्जुनी मोरगाव - 61.65
आरमोरी -60.5
दिंडोरी - 59.33
कागल - 58.71
करवीर - 58.63
चिमूर -57.79
आमगाव - 57.67
ब्रह्मपुरी - 56.34
कळवण - 55.81
कर्जत -55.8
इस्लामपूर - 54.84
चंदगड - 54.63
कोरेगाव - 53.86
अलिबाग - 53.4
भोकरदन - 53.29
अकोले - 53.19
अचलपूर 53.03
इगतपुरी 52.64
कराड दक्षिण- 52.56
हिंगणघाट- 52.43
कोपरगाव - 52.39
चिपळूण - 22.33
कराड उत्तर 52.06
घनसावंगी - 51.99
बदनापूर - 51.29
आर्णी - 51.21
चांदवड - 51.06
दापोली - 50.8
मुंबईत दुपारी 3 वाजेपर्यंत 39.34 टक्के मतदान
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत अंदाजे 39.34 टक्के मतदान झाले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आजसकाळी 7.00 वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत अंदाजे 39.34 टक्के मतदान झाले आहे.
साताऱ्यात नागरिकाला मतदान करताना हृदयविकाराचा झटका
साताऱ्यात मतदानावेळी एक दुर्दैवी घटना घडली. मतदान करताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. सातारा खंडाळ्यातील मोरवे गावातील ही घटना आहे. शाम धायगुडे असे मतदानकर्त्याचे नाव आहे. ते 67 वर्षांचे होते. मतदानाला गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आणखी वाचा