Raigad News : सराव करणाराच झाला भाल्याचा शिकार... डोक्याला भाला लागून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
Raigad News : रायगडमध्ये भालाफेकीचा सराव करताना डोक्याला भाला लागून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे.
वणी, रायगड : भालाफेकीचा (Javelin Throw) सराव करताना डोक्याला भाला लागून शालेय विद्यार्थाचा मृत्यू (Student Death) झाल्याची धक्कादायक घटना रायगडमध्ये (Raigad) घडली आहे. माणगांवच्या वणी येथील शाळेतील हा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त (Raigad News) केली जात आहे. वणी येथील आयएनटी ॲकेडमी इंग्लिश स्कूल ॲण्ड हायस्कूलमध्ये (INT Academy English High School, Raigad) ही घडली घटना घडली आहे. भालाफेकीचा सराव करताना भाला थेट विद्यार्थ्याच्या डोक्यात घुसला आणि त्याचा जागीत मृत्यू झाला.
सराव करणाराच झाला भाल्याचा शिकार
आयएनटी ॲकेडमी इंग्लिश स्कूल ॲण्ड हायस्कूल (INT Academy English High School, Raigad) मध्ये तालुकास्तरीय स्पर्धेचे सराव सुरु होते. दरम्यान, भालाफेक खेळाचा सराव करताना ही दु: खद घटना घडली आहे. भालाफेकीचा सराव करणाराच भाल्याचा शिकार झाला. डोक्याला भाला लागून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पोदंकुले तसेच गोरेगांव पोलिसांनी घटनास्थळी पाहाणी केली. विद्यार्थाचा मृतदेह प्राथमिक तपासणीनंतर शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे पाठविण्यात आल आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगांव पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
डोक्याला भाला लागून शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शाळेच्या मैदानावर तालुकास्तरीय स्पर्धेचा सराव सुरु होता, यावेळी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालाफेकीचा सराव करताना ही दुर्घटना घडली. भालाफेकीचा सराव करताना भाला डोक्याला लागून शाले विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याचं नाव हुजाईफा दावरे (Huzaifa Qutbuddin Dawre) असून तो दहावी इयत्तेत शिक्षण घेत होता.
10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा करुण अंत
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला सांगितलं गेलं की, मृत विद्यार्थ्याने स्वच:च फेकलेल भाला त्याच्या डोक्यात गेला आणि त्याचा मृत्यू झाला. मात्र, तपासामध्ये पोलिसांना आढळलं की, दुसऱ्या विद्यार्थ्याने फेकलेला भाला डोक्याला लागून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हुजाईफा दावरेने सराव करताना भाला फेकला. यानंतर समोरील विद्यार्थाने तो भाला उललला आणि परत हुजाईफा दावरेकडे फेकला आणि तो भाला मृत विद्यार्थाच्या डोक्याला लागला आणि विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस तपास सुरु असताना ही माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :