Pushpa 2 Box Office Collection Day 47: पुष्पाभाऊ जोमात, 47व्या दिवशीही कमाई जोरदार; चार दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'आझाद'लाही पछाडलं
Pushpa 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 रिलीज झालेल्याला 47 दिवस झाले आहेत. पण आजही फिल्मची कमाई दमदार आहे.
Pushpa 2 Box Office Collection Day 47: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2 The Rule) हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर (Box Office) 47 दिवस पूर्ण करत आहे. पुढील तीन दिवसांत हा चित्रपट 50 दिवस थिएटरमध्ये राहण्याचा विक्रम रचणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले 'आझाद' (Azad Movie), 'इमर्जन्सी' (Emergency Movie) आणि 'गेम चेंजर' सारखे चित्रपट असूनही, 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
या चित्रपटानं एकामागून एक अनेक विक्रम मोडले. हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आणि बाहुबली 2 कडून सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटाचा किताबही हिसकावून घेतला. आज चित्रपटाच्या कमाईचे जे आकडे समोर आले आहेत, ते इतक्या दिवसांनी चित्रपटगृहात सुरू असलेल्या चित्रपटासाठीही आदरणीय आहेत.
पुष्पा 2 चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
पुष्पा 2 नं पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 129.5 कोटी रुपये, चौथ्या आठवड्यात 69.65 कोटी रुपये आणि पाचव्या आठवड्यात 25.25 कोटी रुपये कमावले. या चित्रपटानं सहाव्या आठवड्यात 9.7 कोटी रुपये कमावले.
यानंतर, सातव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 44 व्या दिवशी, त्याने 95 लाख रुपये आणि 45 व्या दिवशी 1.1 कोटी रुपये कमावले. यानंतर, 46 व्या दिवशी त्यानं 1.5 कोटी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या मते, आज सकाळी 10:35 वाजेपर्यंत चित्रपटाने 65 लाख रुपये कमावले आहेत आणि चित्रपटाचे एकूण कलेक्शन 1228.90 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
View this post on Instagram
आझाद आणि आणीबाणी असूनही पुष्पा 2 चांगली कमाई करतोय
आझाद प्रदर्शित होऊन फक्त 4 दिवस झाले आहेत आणि चित्रपटाचं कलेक्शन सुमारे 5 कोटी रुपयांचं आहे. आझादनं आतापर्यंत फक्त 53 लाख रुपये कमावले आहेत, तर दीड महिन्यांपासून थिएटरमध्ये सुरू असलेला पुष्पा 2 देखील तेवढीच कमाई करत आहे. कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपटही 17 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता, पण 10 कोटी रुपये कमाई केल्यानंतर त्याचीही गती कमी झाली आहे.
पुष्पाभाऊची बातच और...
पुष्पा 2 हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा द राईजचा दुसरा भाग आहे, ज्याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अल्लू अर्जुन रक्त चंदनाचा तस्कर पुष्पराजची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट सुमारे 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.