(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zika Virus in Pune: पुणेकरांची चिंता वाढली! झिकाची रूग्णसंख्या 19 वर; ज्येष्ठ नागरिकाला लागण
कोरोनानंतर आता झिका व्हायरसमुळे डोकेदुखी वाढली आहे. पुण्यात झिका बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. झिका रूग्णांची संख्या आता 19 वरती पोहोचली आहे.
पुणे: कोरोनानंतर आता झिका व्हायरसमुळे (Pune Zika Virus) डोकेदुखी वाढली आहे. पुण्यात झिका बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. झिका रूग्णांची संख्या आता 19 वरती पोहोचली आहे. पुण्यात एका जेष्ठ नागरिकाला झिकाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. झिकाची लागण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. 19 पैकी 10 गर्भवती महिलांना झिकाची लागण झालेली होती. शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे झिकावर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे. शहरात गर्भवती महिलांच्या चाचण्या देखील करण्यात येत आहेत.
झिकाचा धोका आता ज्येष्ठ नागरिकांना?
गर्भवती महिलांसोबतच आता झिकाचा(Pune Zika Virus) धोका आता ज्येष्ठ नागरिकांना देखील असल्याचं दिसून येत आहे. हडपसर येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला झिकाची लागण झाल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या ज्येष्ठ नागरिकाला गॅस्ट्रोएन्टेरिटिससाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांना झिकाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वाधिक रुग्ण एरंडवणे भागात
पुणे शहरात आतापर्यंत 19 रूग्ण सापडले आहे. त्यापैकी सर्वाधिक 6 रुग्ण एरंडवणे परिसरातील आहेत.
एरंडवणे -6
मुंढवा 3
डहाणूकर कॉलनी 2
पाषाण- 3
आंबेगाव 1
खराडी-3
येरवडा -1
काय आहेत लक्षणे?
झिकाने व्हायरसने(Pune Zika Virus) ग्रस्त असलेल्या रूग्णांमध्ये सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. डोकेदुखी, ताप, शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात. शहरात आढळलेल्या झिकाच्या रूग्णांमध्ये ताप, उलट्या, जुलाब, अशक्तपणा अशी लक्षणे सर्व रुग्णांना सारखी आढळून आल्याची माहिती आहे.