एक्स्प्लोर
वडील रागवल्याने पुण्यात तरुणाकडून बाईक-रिक्षांची जाळपोळ
पुणे : वडील रागावल्यामुळे पुण्यातील एका तरुणाने वाहनांची जाळपोळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाने स्वतःच्या दुचाकीसह आणखी एक बाईक, दोन रिक्षा पेटवल्या, तर कारचीही तोडफोड केली.
वडील रागवल्यामुळे धीरज शंकर कटिकर या 22 वर्षीय तरुणाला संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्याने स्वतःच्या दुचाकीची तोडफोड करत त्यातील पेट्रोल रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकी, रिक्षा आणि कारवर शिंपडलं. त्यानंतर या वाहनांची तोडफोड करुन पेटवल्याची धक्कादायक माहिती आहे.
हा प्रकार पुण्यातील जनवाडी परिसरात घडला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून पोलिसांनी तरुणाला तात्काळ अटक केली. यात सामान्य नागिरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement