एक्स्प्लोर

येत्या काही दिवसात राज्यात पावसाची स्थिती काय असेल? हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांचा अंदाज

कोकणामध्ये आजपासून तर मराठवाड्यामध्ये 10 तारखेपासून आणि मध्य महाराष्ट्रात 11 तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

पुणे : आफ्रिकेतून येणारे कोरडे वारे आपल्या बाष्पयुक्त हवेमध्ये मिसळतात त्यामुळे पावसावर परिणाम झाला आहे. परंतु जून आणि जुलैमध्ये पावसात खंड होईल हे भाकित वर्तवलं होतं, अशी माहिती हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितलं. लोकांना सावध करावे या अनुषंगाने जिथे 65 मिलिमीटर पाऊस होईल किंवा त्यापेक्षा जास्त होईल तिथे वापसा येताच पेरण्या कराव्यात आणि पाऊस कमी झाला असेल किंवा 65 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाला असेल आणि जमिनीत ओलावा नसेल तर पेरणी करू नये ही बाब आधीच सांगितली गेली होतीस, असं साबळे यांनी सांगितलं.
 
मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये माझ्याकडे जवळ जवळ 16 वेधशाळेचा डेटा येतो. विदर्भातल्या चार मराठवाड्यातील एक त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील या सहा ते सात आणि कोकण कृषी विद्यापीठाची एक अशा या सगळ्यांच्या अभ्यासावरून मला असे दिसून आले यावर्षी साधारणपणे वाऱ्याचा वेग मार्च, एप्रिल, मे महिन्यात दोन ते अडीच किलोमीटर प्रति तास होता. ज्या वेळेला आठ ते नऊ किलोमीटर प्रतितास वेळ असायला पाहिजे होता, त्यावेळी दोन ते तीन किलोमीटर प्रतितास वेळ झाला. तरीही निश्चित माझ्या मॉडेलनुसार सांगता येईल की हमखास जूनमध्ये आणि जुलैमध्ये पावसात खंड होता, हे सांगितले होते. ज्यावेळी याला दुजोरा देणारी आणखी एक दुसरी भारतातील घटना घडली ते म्हणजे यावर्षीचे तापमान मार्च, एप्रिलमध्ये पाहिलं तर दोन अंश सेल्सिअसने तापमान सरासरीपेक्षा कमी होते व सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी होता. हे तीन घटक इतके मार्मिक आहेत की या घटकांवरून सांगता येतं की हे घडणार होतं, असं रामचंद्र साबळे यांनी सांगितल. 
 
सद्यस्थितीत महाराष्ट्रावर कमी दाबाचा हवेचे क्षेत्रे निर्माण होत आहे आणि त्यानुसार पावसाला सुरुवात होत आहे. कोकणामध्ये आजपासून तर मराठवाड्यामध्ये 10 तारखेपासून आणि मध्य महाराष्ट्रात 11 तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल. साधारणपणे 13 जुलैला आणखी हवेचे दाब कमी आहेत त्यामुळे 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टीची संभावना आहे, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

कोकणामध्ये सध्या भात लागवड थांबलेली आहे. तसेच मराठवाड्यात जेव्हा चांगला पाऊस होईल तेव्हा उरलेल्यांना पेरणी करता येईल. पेरणी करताना साधारणपणे यापुढे चार ओळी सोयाबीनच्या एक ओळ तुरीची अशा पद्धतीने पेरणी केली तर तूर आणि सोयाबीन या दोन्ही पिकांना फायदा होऊन शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकेल. याशिवाय काही ठिकाणी बाजरीची पेरणी थांबली, ज्वारीची पेरणी थांबलेली ही देखील खरी आहेत. त्यामध्ये आंतरपीक तुरीचे पीक घ्यायला पाहिजे. दोन ओळी बाजरीच्या किंवा ज्वारीच्या आणि त्यानंतर एक तुरीची अशा पद्धतीने जर पेरणी केली तर दोन्ही पिकांचे उत्पादन मिळू शकेल. आता होणारा पाऊस हा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. खरिपात आधीच्या पेरण्या झाल्या त्यांना जीवदान मिळणार आहे. यापुढे होणाऱ्या पेरण्यांना देखील त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होतोय तसेच पुढेदेखील ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

काही तुरळक ठिकाणी जोराचा पाऊस झाला तर तिथेच शेतातून पाणी काढून देणे महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. अशा पद्धतीने पाऊस, हवामान आणि शेतीचा विचार करावा लागणार आहे. सर्व शास्त्रज्ञांच्या मते 2012, 2015, 2018 चा मोठा दुष्काळ असो वा कोल्हापूरला आलेला महापूर किंवा गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दिवसात झालेला पाऊस असो हे आणीबाणीचे संकेत देतात. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
धक्कादायक! दुहेरी हत्याकांडानं पुण्यातील जुन्नर हादरलं, मुलानेच वडीलांसह सख्ख्या भावाला संपवलं
धक्कादायक! दुहेरी हत्याकांडानं पुण्यातील जुन्नर हादरलं, मुलानेच वडीलांसह सख्ख्या भावाला संपवलं
पुणे विषारी दारु प्रकरण! जिथून विषारी दारुची विक्री झाली  तो दारु अड्डा नेस्तनाबूत करणार, पुढच्या 24 तासात कारवाई होणार
पुणे विषारी दारु प्रकरण! जिथून विषारी दारुची विक्री झाली  तो दारु अड्डा नेस्तनाबूत करणार, पुढच्या 24 तासात कारवाई होणार
Abhijit Dipke : कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंचा पुण्यातील वकिलाला फोन, भारतात मोठ्या आंदोलनाची तयारी, नेमक काय घडलं?
कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंचा पुण्यातील वकिलाला फोन, भारतात मोठ्या आंदोलनाची तयारी, नेमक काय घडलं?

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aviation Sector Fund : महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
Kolhapur Crime: कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
Khan Sir: बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले
बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले
Embed widget