एक्स्प्लोर
पुण्यातील झोपडीत शस्त्रसाठा, छंद म्हणून शस्त्र बनवल्याचा आरोपीचा दावा
केवळ छंद म्हणून बनवत असून, टिव्हीमध्ये पाहून बनवण्याचा प्रयत्न केला असा जवाब अभंग यांनी दिला. तसेच 2003 साली अटक होऊन, निर्दोष मुक्तता झाल्याचा दाखला अभंग यांनी पुढे दिला.
पिंपरी : पुण्यातल्या एका झोपडीत शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. केवळ छंद असल्याने एक ज्येष्ठ व्यक्तीने हा साठा तयार केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक माहितीत उघडकीस आलं आहे. जुन्नर तालुक्यात हा शस्त्रसाठा सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसने ही कारवाई केली.
राजाराम अभंग असं शस्त्रसाठा तयार करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव असून ते एका झोपडीत राहतात. जुन्नर तालुक्यातील भटकळवाडी येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवीत चार गावठी इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर आणि पत्र्याचे बंदुकीचे साचे हस्तगत करण्यात आले आहेत. केवळ छंद म्हणून बनवत असून, टिव्हीमध्ये पाहून बनवण्याचा प्रयत्न केला असा जवाब अभंग यांनी दिला. तसेच 2003 साली अटक होऊन, निर्दोष मुक्तता झाल्याचा दाखला अभंग यांनी पुढे दिला.
VIDEO | पुण्यातील झोपडीत शस्त्रसाठा, लेक्ट्रॉनिक डिटोनेटर आणि बंदुकीचा साचा जप्त | एबीपी माझा
2003 सालीही अभंग यांच्याकडे असाच शस्त्रसाठा आढळला होता. तेंव्हा त्यांची निर्दोष मुक्तता झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजाराम अभंग हे त्या झोपडीत एकटेच रहायचे. पण त्यांचे कुटुंबीय त्याच गावात पण स्वतंत्र राहतात. त्यांना दोन मुलं ही आहेत. 2006 साली तुरुंगातून बाहेर आल्यापासून कुटुंबाने त्यांच्याकडे लक्ष देणे बंद केले. मंगळवारी पोलिसांनी त्यांना अटक करुनही अध्याप कुटुंबातील एकही व्यक्ती पोलिसांकडे गेली नाही. तर हा शस्त्रसाठा मी कोणताही हल्ला करण्यासाठी बनवला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement