एकमेकांमध्ये समन्वय ठेवून अजान म्हटली जावी ; अब्दुल शकुर खान नद्वी
Pune News : अजान देताना सर्वोच्च न्यायालयाच्या आवाजाच्या मर्यादेचे पालन व्हावे, असे मत नुरे इलाही मस्जिदचे ईमाम अब्दुल शकुर खान नद्वी यांनी व्यक्त केले आहे.
Pune News Update : "एक किलोमीटरच्या आतमधे एका पेक्षा जास्त मशीदी असतील तर त्यांनी आपापसात ठरवावं की कोणत्यातरी एकाच मशिदीतून अजान म्हटली जावी. मशिदीतील लाऊडस्पीकरवर अनेक वेळा भाषणे दिली जातात, कव्वाली किंवा गाणी वाजवली जातात, ती लावली जाऊ नये. अजान व्यतिरिक्त मशिदीतील लाऊडस्पीकरवर दुसरे काहीही वाजवले जाऊ नये. मुस्लिम समाजाने स्वतःच्या काही चुका सुधारायला हव्यात, काळानुरूप काही बदल स्वीकारायला पाहिजेत, असे मत नुरे इलाही मस्जिदचे ईमाम अब्दुल शकुर खान नद्वी यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही दिवासंपासून राज्यात मशिदीवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. मशिदीवरील भोंगे उतरवले नाहित तर मशिदीपुढे हनुमान चालिसा म्हटली जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. शिवाय 3 मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदीवरील भोंगे काढून टाकण्याचा अल्टिमेटही राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर राज्यातील अनेक मुस्लिम संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, काही मुस्लिम संघटनांनी समन्वयाची भूमिकाही घेतली आहे.
"दिवसात पाच वेळा अजान दीली जाते. सुर्योदयापूर्वी सहा वाजण्याच्या आधी दिली जाणारी अजान स्पीकरवरुन दिली जाऊ नये. ही अजान आम्ही लाऊडस्पीकरवरून देत नाही. अजान देताना सर्वोच्च न्यायालयाच्या आवाजाच्या मर्यादेचे पालन व्हावे असे अब्दुल शकुर खान नद्वी यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यातील वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत बोलताना 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे काढण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यावरून राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर काही मुस्लिम संघटनांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा विरोध केला आहे. त्यातच आता अब्दुल शकुर खान नद्वी यांनी अजान देताना सर्वोच्च न्यायालयाच्या आवाजाच्या मर्यादेचे पालन व्हावे असे मत व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, इश्वर सर्वशक्तिमान आहे आणि त्याची पूजा करा, असा अजानचा अर्थ आहे. सर्व धर्मांमधे हेच सांगण्यात आले आहे. हिंदू, जैन आणि शिखांना अजान म्हणजे काय याचा परिचय करून देण्यासाठी मशिदीमधे बोलवायला हवे. अजानचा अर्थ समजावून सांगण्यासाठी अजान परिचय कार्यक्रम राबवायला हवा."
महत्वाच्या बातम्या
- हरिनाम सप्ताहात रोजेदार मुस्लिम बांधवांसाठी पंगत, बीडमधील पाटोद्यात गावकऱ्यांनी जपला सामाजिक एकोपा
- Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी; केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?
- कुणाला बाळासाहेबांची कॉपी करायचीय, स्पॉन्सरशिपचं राजकारण करायचंय त्यांना करु द्या : संजय राऊत
- Raj Thackeray : राज ठाकरे घेणार प्रभू श्रीरामांचे दर्शन; 5 जून रोजी अयोध्या दौरा