एक्स्प्लोर

Maharashtra Politics : नगरमध्ये मोठा राजकीय भूंकप? भाजपचा बडा नेता तुतारी हाती घेणार? शरद पवारांसोबत एकाच गाडीत केला प्रवास

Sharad Pawar and Vivek Kolhe : भाजपचा बडा नेता तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले या दरम्यान भाजप नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी आज शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे. अशातच महायुतीतील अनेक नेते शरद पवारांच्या पक्षात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नगर जिल्ह्यात शरद पवार मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. भाजपचा बडा नेता तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले या दरम्यान भाजप नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी आज शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विवेक कोल्हे आणि शरद पवार यांनी आज एकाच गाडीतून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात महायुती सरकारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही जागांवर तेढ निर्माण झाली आहे, त्याचप्रमाणे कोपरगावमध्येही मतदारसंघावरून आणि जागेवरून धुसफूस पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार आशुतोष काळे (Ashotosh Kale) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) काही दिवसांपूर्वीच आशुतोष काळे यांनी उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे भाजप नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) कोडींत सापडले आहेत. आता विवेक कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच दरम्यान आज शरद पवार आणि विवेक कोल्हे यांनी आज एकाच गाडीतून प्रवास केला. या प्रवासावेळी त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली असावी याबाबत उत्सुकता नेत्यांना लागली आहे. 

शरद पवारांसोबत एकत्र प्रवास

यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात शरद पवार (Sharad Pawar) भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कोपरगावचे विवेक कोल्हे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकत्र प्रवास केला. शरद पवार यांनी विवेक कोल्हे यांना स्वतःच्या गाडीत बसण्याची सूचना केली. त्यानंतर विवेक कोल्हे हे पवारांच्या गाडीतून रवाना झाले. कोल्हे सध्या भाजपमध्ये आहेत मात्र, भाजपमध्ये ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहेत. ते विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विवेक कोल्हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक 

विवेक कोल्हे हे सहकारातील दिग्गज नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू आहे. तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. काही दिवसांपूर्वी विवेक कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात (Nashik Teachers Constituency Election) नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत त्यांनी किशोर दराडे त्यांना तगडे आव्हान दिले होते. आता विवेक कोल्हे हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ICC Women's T20 World : Tejaswini Pandit Ek Number Movie  : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला 'येक नंबर' सिनेमाABP Majha Headlines : 11.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra News:विदर्भात महायुतीतले वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे,वळसे पाटलांवर आशिष देशमुखांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Embed widget