एक्स्प्लोर

मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बिड्या प्यायचो; गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा

Vijay Shivtare: चौथीत असताना बिड्या पित असल्याचा खळबळजनक खुलासा माजी मंत्री विजय शिवातरे यांनी सासवडमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात केला आहे.

Vijay Shivtare Talked About His Childhood: पुणे : लहानपणी फार मस्तीखोर, बंडखोर होतो, पण अभ्यास न करता देखील शाळेत हुशार होतो. तर चौथीत असताना बिड्या पित असल्याचा खळबळजनक खुलासा माजी मंत्री विजय शिवातरे (Vijay Shivtare) यांनी सासवडमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात केला आहे. सासवड (Saswad) येथील विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना शिवतारेंनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. 

लहानपणी मी फार वांड होतो, चौथीत असताना बिड्या पित असल्याचा खळबळजनक खुलासा विजय शिवातरे यांनी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना केला आहे. चौथीत असताना जनावरं वळायला जायचो, त्यावेळी आईच्या पिशवीतून पैसे चोरून बिड्या आणायचो आणि ओढायचो. बिडी ओढली की, चक्कर येऊन पडायचो, असा खुलासा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. विजय शिवातरे यांनी सासवड मधील आचार्य अत्रे सभागृहात शनिवारी (22 जून 2024) गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. पण हे सांगताना मी अभ्यास न करता शाळेत हुशार असल्याचं विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यातच शिवतारेंचं वक्तव्य 

विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलतानाच माजी मंत्री विजय शिवतारे यांनी हा खळबळजनक खुलासा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विजय शिवातरे यांनी सासवड मधील आचार्य अत्रे सभागृहात शनिवारी (22 जून 2024) गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. पण हे सांगताना मी अभ्यास न करता शाळेत हुशार असल्याचं विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे. 

नेमकं काय म्हणाले विजय शिवतारे? 

माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले की, "लहानपणी मी खूप वांड होतो. प्रचंड बंडखोर... प्रचंड... म्हणजे, चौथीत बिड्या प्यायचो मी, तुम्हाला कुणाला विश्वास बसेल का? गुरं वळायला जायचं, गुरं सोडायची... चालत हरकुळला जायचं... आईच्या पिशवीतले चार आणे चोरायचे, बिडीचं बंडल आणायचं, दोन-चार बिड्या प्यायलो की, चक्कर येऊन पडायचो. असा बंडखोर प्रवृत्तीचा मी होतो. पण एक होतं... तरीदेखील मी पहिल्या क्रमांकावर होतो. मी कधीही अभ्यास करत बसायचो नाही. तुम्ही आताही शाळेत गेलात, तर माझं नाव आहे तिथे. माझा हजेरी क्रमांकही असा होता ना... एक दिवस मी डुप्लिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढण्यासाठी शाळेत गेलो. जो हजेरी क्रमांक कधीही बदलत नाही."

लोकसभेत बारामतीत शिवतारेंनी वाढवलेलं अजितदादांचं टेन्शन 

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत रंगली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंनी निवडणूक लढवली. हायव्होल्टेज लढतीत सुप्रिया सुळेंनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. पण, ही निवडणूक सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंपेक्षा अजित पवार आणि शरद पवारांसाठी प्रतिष्ठेची होती. पण या निवडणुकीत काही काळासाठी अजित पवारांची भलतीच तारांबळ उडाली होती. बारामतीतील राजकीय समीकरण जुळवून आणण्यासाठी अजित पवारांची तारांबळ उडाली असून, महादेव जानकर यांना रोखल्यानंतर अजित पवारांचे कट्टर राजकीय वैरी बनलेल्या विजय शिवतारेंनी बारामती निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता. पण अजित पवारांनी सर्व गणितं जुळवून शिवतारेंसोबत तह केला आणि शिवतारेंनी बारामती लोकसभेतून माघार घेतली.

पाहा व्हिडीओ : Vijay Shivtare Pune : मी चौथीत असताना बिड्या प्यायचो, चक्कर येऊन पडायचो : शिवतारे

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पुण्यातील सहकार नगर हादरलं! दोन तरुणांनी केला गोळीबार, एक जण गंभीर जखमी
धक्कादायक! पुण्यातील सहकार नगर हादरलं! दोन तरुणांनी केला गोळीबार, एक जण गंभीर जखमी
तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंकडून शेतकऱ्याची थट्टा? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंकडून शेतकऱ्याची थट्टा? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Abhijeet Dipke CJP : मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन
मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन
Pune Congress:
"पाठिंबा द्यायला सांगून सह्या घेतल्या, पण अर्ज मागे घेताना अंधारात ठेवलं"; पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकानं उघड केला पुण्याचा 'तो' गेम,थेट राहुल गांधी यांना धाडलं पत्र

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget