एक्स्प्लोर

Eknath Shinde in Pune: पुण्यात प्रति बालाजी, प्रति शिर्डीनंतर आता प्रति एकनाथ शिंदे; विजयराजे माने मुख्यमंत्र्यांचे 'परफेक्ट डुप्लिकेट'

संधी मिळाली तर एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यांना माझा हा लूक दाखवणार आहे. त्यांच्यासोबत फोटो देखील काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde in Pune: पुण्यात (Pune) प्रति बालाजी, प्रति शिर्डी ही ठिकाणं प्रसिद्ध आहेत. आता मात्र पुण्यात प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा (Eknath shinde) आहेत.  भारतीय जनता युवा मोर्चाचे पुण्यातील पदाधिकारी विजयराजे माने(Vijayraje mane) हे काही दिवस झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखा वेष धारण करून पुण्यात फिरत आहेत. त्यामुळे अनेक लोक त्यांच्यासोबत फोटो काढत आहेत तर काहीजण त्यांना आपल्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून निवेदने देत आहेत.  21 जूनपासून आपला चेहरा एकनाथ शिंदेसारखा दिसू लागल्याच त्यांच म्हणणं आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून पांढरे कपडे घालतो
भारतीय जनता युवा मोर्चाचे पुण्यातील पदाधिकारी विजयराजे माने यांनी हूबेहूब मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या सारखा लूक केला आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातले एकनाथ शिंदे किंवा प्रती एकनाथ शिंदेदेखील म्हटलं जात आहे. सुरुवातीला माने रंगीत कपडे परिधान करत होते. त्यानंतर अनेकांनी त्यांना एकनाथ शिंदे यांच्यासारखे पांढरे कपडे परिधान करा, अशी विनंती केली. त्या सगळ्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी पांढरे कपडे परिधान करायला सुरुवात केली. मी मुख्यमंत्र्यासारखा दिसतो, असं जेव्हा लोक सांगतात तेव्हा आनंद होतो, असं माने सांगतात.

मागण्या, प्रसिद्धी आणि सेल्फी
विजयराजे माने यांनी एकनाथ शिंदेंचा वेश धारण केल्यापासून त्यांच्याकडे अनेक लोक वेगवेगळ्या मागण्या घेऊन येत आहेत. त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करत आहेत. समस्या मांडताना दिसत आहेत. त्यासोबतच अनेक मंडळींनी त्यांच्यासोबत सेल्फिसुद्धा काढून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

फक्त वेष नाही तर लोकांची सेवाही करणार
विजयराजे माने यांनी एकनाथ शिंदेंचा वेश धारण केला आहे. मात्र फक्त वेश घारण करुन प्रसिद्ध होणार नाही तर लोकांची सेवादेखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम मला आवडतं. जनतेची सेवा करण्यासाठी ते कायम तत्पर असतात. मलाही तशीच जनतेची सेवा करायची आहे, असं ते सांगतात. यंदा संधी मिळाली तर निवडणूक लढवणार असल्याची इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांसमोर याच वेशात जाणार
उद्या म्हणजेच 2 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर आहेत. संधी मिळाली तर एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यांना माझा हा लूक दाखवणार आहे. त्यांच्यासोबत फोटो देखील काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget