Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
Pune Moshi Building Collapse: पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या अपघातातील मयत नागेश गायकवाड यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे.

Pune Moshi Building Collapse पुणे : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात (Moshi Building Collapsed) एक मोठी बातमी समोर आली आहे. या अपघातातील मयत नागेश गायकवाड यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मयत नागेश गायकवाड यांच्या पत्नीने रात्री उशिरा गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोनाली नागेश गायकवाड अस आत्महत्या केलेल्या महिलेच नाव आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Moshi Building Collapse)
दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर गायकवाड दांपत्याला दोन मुली आहेत, परंतु ठीक एक महिन्यानंतर नागेश यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नागेश गेल्यानंतर त्या तणावात होत्या, दुःखी होत्या, यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.
Moshi Building Collapse : एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनेत एकूण नऊ कामगारांचा जीव गेला होता. यामध्ये नागेश गायकवाड यांचा देखील मृत्यू झाला होता. आता नागेशच्या पत्नीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. नागेशच्या पत्नीचं नाव सोनाली गायकवाड असं होतं, त्या 23 वर्षीच्या होत्या. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. मात्र कमी वयात पतीला गमावून बसल्याचं दुःख सहन न झाल्यानं, सोनाली यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. तर या दुर्दैवी घटनेनंतर चिमुकल्या श्रेया-प्रियाचं छत्र मात्र हरपलं आहे.
Moshi Building Collapse : एक महिन्यानंतर अनेक प्रश्न अनुत्तरित? सरकार, पालिका अन पोलिसांची भूमिका संशयास्पद?
पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनेला आज एक महिना पूर्ण झाला. या दुर्घटनेत नऊ निष्पाप कामगारांचा जीव गेला, बारा कामगार जायबंदी झाले. पण या दुर्घटनेला घेऊन आज ही बरेच प्रश्न अनुत्तरित आहे. कारण महापालिका प्रशासन आणि पोलिसांचं बचावाचं धोरण आहे, केवळ चालढकलचं सुरु असल्यानं मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. आत्तापर्यंत कंत्राटदार कंपनीच्या दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला, एकाला अटकही झाली. मात्र त्यापुढे केवळ चौकशी सुरुये, जबाब नोंदवले जातायेत, एसआयटी नेमलेली आहे. असं सांगून पोलीस मुख्य सुत्रधारांना अटकेपासून संरक्षण देतायेत. दुसरीकडे महापालिकेने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केलं. पण त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं धाडस अद्याप दाखवलेलं नाही. अनधिकृत बांधकामाकडे कानाडोळा करणाऱ्यांनाही अभय दिलं जातंय. मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केलेली मदत आणि दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यामुळे पालिका, सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जातोय.
Pune News: पालिका, सरकार आणि पोलिसांची संशयास्पद भूमिका?
-दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. पण मुख्य सूत्रधार कोण?
-एकाला अटक, पण कंत्राटदार ऍंथोनी कंपनीच्या संचालकांना अटकेपासून संरक्षण?
-संजय कुलकर्णी, योगेश आल्हाट आणि ऋषिकांत चिपाडे या पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांचं निलंबन. पण गुन्हा दाखल का नाही?
-कंपनी आणि निलंबित अधिकाऱ्यांचे केवळ जबाब नोंदवून, पोलिसांनी काय साध्य केलं?
-एसआयटी पथकाचा केवळ फार्स?
-दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना अभय का दिलं?
-सात मृतांच्या नातेवाईकांना पालिकेची 10 लाखांची आर्थिक मदत मिळाली, पण कंपनीची 25 लाखांची आणि सरकारची 3 लाखांची मदत का दिली नाही?
-मृतांच्या वारसांना अद्याप नोकरी देण्याबाबत ठोस निर्णय का नाही?
-मृतांच्या नातेवाईकांना ऍंथोनी कंपनी संपर्क होऊ देत नाही? मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची ही केवळ घोषणाच?
8 जुलै - कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला
9 जुलै - पहिल्या कामगाराचा मृत्यू
11 जुलै - इमारत अनधिकृत असल्याचा एबीपी माझाने पर्दाफाश केला
12 जुलै - 83 तासानंतर बचावकार्य संपलं, 9 कामगारांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट
13 जुलै - पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाटना नोटीस देण्याचे आदेश
14 जुलै - शासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली
14 जुलै - रात्री उशिरा कंपनीच्या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
15 जुलै - पर्यावरण विभागाचे कुलकर्णी आणि आल्हाट यांचं निलंबन
21 जुलै - NGT कडून स्वतंत्र चौकशीचे आदेश
27 जुलै - अनधिकृत बांधकामाला एनओसी दिली म्हणून अग्निशमन दलाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडेंचे निलंबन





















