एक्स्प्लोर

जो त्या वकिलाच्या चार कानशि‍लात लावेल त्याचा मी सत्कार करणार; कुटुंबीयांनी आरोप फेटाळले; खडसेही संतापल्या

वैष्णवी प्रकरणात न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात आज पुणे (Pune) न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत हगवणेंच्या वकिलांनी खळबळजनक दावे केले आहेत. अज्ञात व्यक्तीसोबत वैष्णवीच्या व्हॉट्सअप चॅटचा दाखला देत तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून हगवणेंचा निषेधही व्यक्त केला. आरोपी हा आरोपी असतो, तो गुन्हेगार असतो. कोणीही सहजपणे आपला गुन्हा कबूल करत नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर (court) पूर्ण विश्वास आहे, पोलिस तपास योग्य पद्धतीने चालू आहे. हगवणेंकडून केलेल्या आरोपांचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत वैष्णवी हगवणे (Vaishnavi hagwane) आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या मामांनी आपली बाजू माध्यमांसमो मांडली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही यात उडी घेत थेट वकिलांवर हल्लाबोल केला आहे. जो त्या वकिलाच्या चार कानशि‍लात लावेल त्याचा मी सत्कार करणार, असं रोहिणी खडसेंनी म्हटलं आहे.

वैष्णवी प्रकरणात न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. आरोपी वैष्णवीचा नवरा शशांक, आई लता आणि नणंद करिश्माला एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आल असून सासरे राजेंद्र आणि सुशील यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. दरम्यान, सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना वैष्णवीचा छळ करण्यात आला नसल्याचे हगवणेंच्या वकिलाने म्हटलं. एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हॅरेसमेंट ठरत नाही, ही मिडीया ट्रायल सुरु आहे, असे वकील विपुल दुषिंग यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. त्यावरुन, रोहणी खडसेंनी ट्विट करत वकिलांना चपराक लगावली आहे. जो त्या वकिलाच्या चार कानशि‍लात लावेल त्याचा मी सत्कार करणार, असं रोहिणी खडसेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, या सुनावणीवेळी हगवणेंच्या वकिलांनी गंभीर आरोप केले आहेत, त्यावर आता कस्पटे कुटुंबीयांनी बाजू मांडत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आरोपी हा आरोपी असतो, तो गुन्हेगार असतो. कोणीही सहजपणे आपला गुन्हा कबूल करत नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, पोलिस तपास योग्य पद्धतीने चालू आहे. हगवणेंकडून केलेल्या आरोपांचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

कुठलंही चॅटिंग झालं नाही, आरोप खोटे - वैष्णवीचे मामा

आमच्या वकिलावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, अशा प्रकारचं कोणतंही चॅटिंग झालं नसल्याचं आम्ही स्पष्ट करतो. आम्ही कोणाचाही मोबाईल काढून घेतलेला नाही. वैष्णवीचा मृत्यू 16 तारखेला झाला. मी स्वतः 17 तारखेला फोन करून बाळाची विचारणा केली होती. माझं करिष्मासोबत बोलणं झालं होतं. तेव्हा, राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मेव्हणीने सांगितलं की बाळ रडतंय, त्याला घेऊन जा, अशी माहिती वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी माध्यमांना दिली. तसेच, ही एकतर्फी प्रेमाची बाब होती, पण दुसऱ्या बाजूला पैशावर प्रेम होतं असेही त्यांनी म्हटले. मामांनी पुन्हा एकदा पैशांचा मुद्दा उपस्थित करत हगवणेंकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

दिशाभूल करण्याचा प्रयत्न - मोहन कस्पटे

असा कोणताही प्रकार घडलेला नाही, हे आम्ही स्पष्ट करतो. वकिलांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे, चॅटिंग आणि इतर आरोप चुकीचे आहेत. या प्रकरणात आता काही नवे सापडत नाही, म्हणून चुकीची माहिती पसरवली जात आहे, असे वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी म्हटलं आहे. आम्हाला आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. जे हक्क त्यावेळी सोडले गेले होते, तेव्हाच वैष्णवी आमच्याकडे होती, असेही वैष्णवीच्या काकांनी वकिलांच्या आरोपावर आणि कोर्टात हगवणे कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यासंदर्भाने बोलताना म्हटले.

हेही वाचा

Video वैष्णवीच्या चॅटिंगचे व्हिडिओ आम्हीही व्हायरल केले असते, पण...; हगवणेंच्या वकिलाचा खळबळजनक दावा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SSC Exam Result: 10वीचा निकाल जाहीर होऊन 4 दिवस उलटले, अजूनही विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत; तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; बोर्डाकडून अद्याप ठोस उत्तर नाही
10वीचा निकाल जाहीर होऊन 4 दिवस उलटले, अजूनही विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत; तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; बोर्डाकडून अद्याप ठोस उत्तर नाही
Vivek Oberoi Shares Post On Sunetra Pawar: 'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट
'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट
Pune Crime Nasrapur Case: जिथे स्वातंत्रवीर सावकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तिथेच नराधमांची होळी व्हावी; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
जिथे स्वातंत्रवीर सावकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तिथेच नराधमांची होळी व्हावी; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
'देव तारी त्याला कोण मारी'! मालगाडी अंगावर आली... अन् महिला रुळावर झोपली, पाटस स्टेशनवरील थरारानं चुकला काळजाचा ठोका 
'देव तारी त्याला कोण मारी'! मालगाडी अंगावर आली... अन् महिला रुळावर झोपली, पाटस स्टेशनवरील थरारानं चुकला काळजाचा ठोका 

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
Embed widget