एक्स्प्लोर

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या कार्यक्रमात गोंधळ, कार्यकर्त्येच आपआपसांत भिडले 

महापरिनिर्वाण दीनानिमित्त अनुयायांनी कोरोनाचा धोका असल्याने गर्दी करु नये, याबाबतचे आवाहन करण्यासाठी रामदास आठवलेंनी लोणावळा येथे पत्रकार परिषद घेतली.

पुणेकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलें यांनी सोमवारी (6 डिसेंबर) होणाऱ्या महापरिनिर्वाण दीनानिमित्त अनुयायांनी गर्दी करु नये असे आवाहन देण्यासाठी लोणावळा येथे पत्रकार परिषद घेतली. कोरोनाचा धोका कायम असल्याने त्यांनी याप्रकारचं आवाहन केलं. पण यावेळी उपस्थित आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्येच खडाजंगी पाहायला मिळाली. आठवलेंच्या कार्यक्रमातच त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला होता. पद वाटपावरून हा वाद झाल्याचं समोर येत असून यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता.

पत्रकार परिषदेवेळी एका व्यक्तीने आठवलेंकडे पदवाटपावरुन तक्रार केल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्याने त्याला टोकले. 'तुम्हाला गटबाजीच करायची आहे का?' असा जाब त्याने संबधित व्यक्तीला विचारला आणि त्यावरून वादाला तोंड फुटले. ज्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद सुरु झाला. यावेळी आठवलेंनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच कोणाचं ऐकत नसल्याने आठवले पुढील कार्यक्रमाला रवाना झाले. 

अनुयायांना गर्दी न करण्याचे आवाहन

देशात कोरोनाचं संकट अजूनही असल्याने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांनी गर्दी करु नये यासाठी आठवलेंनी खास पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, ''उद्या असणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशातील अनुयायांनी गर्दी करू नये, घरी राहूनच अभिवादन करावं.'' अनुयायांना ओमायक्रॉन व्हेरिएन्टच्या अनुषंगाने हे आवाहन आठवलेंनी केलं.  

मुंबईत येणाऱ्या अनुयांसाठी रेल्वेकडून विशेष सुविधा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेने (Central Railway) विशेष सुविधांचे नियोजन केले आहे. 5 आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री छत्रपटी शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवासाठी आठ उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. यामध्ये मुख्य लाइनवर अप विशेष कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विशेष कल्याण येथून रात्री एक वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री अडीच वाजता पोहोचेल. त्यानंतर कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून रात्री 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.45 वाजता पोहोचेल. याबरोबरच मेन लाइनवर डाऊन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री दीड वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री तीन वाजता पोहोचेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष ही गाडी सीएसटी वरून रात्री अडीच वाजता सुटेल आणि कल्याणला पहाटे चार वाजता पोहोचेल.  हार्बर लाइनवर अप विशेष पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री 2.35 वाजता पोहोचेल. पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.50 वाजता पोहोचेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget