एक्स्प्लोर

Mahaparinirvan Din: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरला येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष सुविधा 

मागच्या वर्षीसारखंच यावर्षी देखील कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे गर्दी न करता अनुयायांनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्याचं आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्यावतीनं करण्यात आल आहे.

मुंबई : उद्या म्हणजेच 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)यांचा महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din) दिन आहे. त्यामुळे दादरच्या चौत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र मागच्या वर्षीसारखंच यावर्षी देखील कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे गर्दी न करता अनुयायांनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्याचं आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्यावतीनं करण्यात आल आहे.

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून चौत्यभूमी परिसरात भव्य असा मंडप उभारण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहेत. सध्या ओमायक्रॉनचं संकट पुढे आले आहे. त्यामुळे विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळेच लक्षणे दिसणाऱ्यांसाठी कोव्हिड चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सोबतच नागरिकांना लसीकरण देखील करता येणार आहे. मास्क आणि इतर मेडिकल सेवा देखील महापालिकेकडून पुरवण्यात आल्या आहेत. सॅनिटायझेशनची सुविधा देखील पुरवली जाणार असून सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी देखील घेण्यात येणार आहे.   

मुंबईत येणाऱ्या अनुयांसाठी रेल्वेकडून विशेष सुविधा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेने (Central Railway) विशेष सुविधांचे नियोजन केले आहे. 5 आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री छत्रपटी शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवासाठी आठ उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. यामध्ये मुख्य लाइनवर अप विशेष कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विशेष कल्याण येथून रात्री एक वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री अडीच वाजता पोहोचेल. त्यानंतर कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून रात्री 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.45 वाजता पोहोचेल. याबरोबरच मेन लाइनवर डाऊन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री दीड वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री तीन वाजता पोहोचेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष ही गाडी सीएसटी वरून रात्री अडीच वाजता सुटेल आणि कल्याणला पहाटे चार वाजता पोहोचेल.  हार्बर लाइनवर अप विशेष पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री 2.35 वाजता पोहोचेल. पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.50 वाजता पोहोचेल.

हार्बर लाइनवर डाउन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 1.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे रात्री 3.00 वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे चार वाजता पोहोचणार आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील अनुयायांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आवाहन केले आहे की, मुंबईतील अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ऑनलाइन अभिवादन करावे. बाहेरून येणारे आनुयायी पाहता कोरोना नियमांचे पालन करावे. फार गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रोनचेही संकट समोर आहे. ऑनलाइन अभिवादन दिवसभर सुरू राहणार आहे. महानगरपालिका सज्ज आहे, असे महापौर म्हणाल्या.

इतर महत्वाच्या बातम्या 

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; संभाजी ब्रिगेडचे कृत्य

साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर कोरोनाची धडक, दोघे पॉझिटिव्ह आढल्याने खळबळ 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
CJP Protest: दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती
दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती
Ashram School Snake Bite: आश्रम शाळेत सहा विद्यार्थ्यांना सर्पदंश; तिघींचा मृत्यू, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांकडून मोठी कारवाई, 'या' 25 मुद्द्यांवर आक्षेप
आश्रम शाळेत सहा विद्यार्थ्यांना सर्पदंश; तिघींचा मृत्यू, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांकडून मोठी कारवाई, 'या' 25 मुद्द्यांवर आक्षेप
Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget