साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर कोरोनाची धडक, दोघे पॉझिटिव्ह आढल्याने खळबळ
अखेच्या दिवशीच पुणे येथून आलेल्या दोन प्रकाशकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. दोघांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
94 marathi sahitya sammelan nashik : नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून मराठीतील आद्य साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नगरीत 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली आहे. तारीख झाहीर झाल्यापासूनच संकटांची मालिका सुरू झालेल्या संमेलनाच्या प्रवेशद्वारावर आता कोरोनाने धडक दिली आहे. साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळ रॅपिड टेस्टमध्ये दोन जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या दोन कोरोनाबाधितांच्या (corona) संपर्कात आलेल्यांना शोधण्याचं आव्हान आता प्रशासनापुढे आहे.
भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात तीन दिवासांपासून सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची आज सांगता होणार आहे. परंतु, अखेच्या दिवशीच पुणे येथून आलेल्या दोन प्रकाशकांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. दोघांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. आता पॉझिटिव्ह प्रकाशकांच्या संपर्कात आणखी किती जण आले आहेत हे शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर रॅपिड चाचणी करूनच आत प्रवेश दिला जात आहे. आज सकाळीही अशीच नियमित तपासणी सुरू असताना दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अहवाल पॉझिटिव्ह येताच संमेलन समितीने सुरक्षेच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत.
संमेलनात अनेकांच्या तोंडावर नाहीत मास्क
मागच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचे रूग्ण सापडल्यानंतर जभरात चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सर्वच देशांना सर्कतेचा इशारा दिला आहे. भारतातही ओमायक्रॉनचे आतापर्यंत पाच रूग्ण सापडले आहेत. त्यातील एक रूग्ण महाराष्ट्रातील आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे देशासह राज्यातही कडक निर्बंध घालण्यात आले आलेत. असे असताना संमेलन स्थळी अनेकांच्या चेहऱ्यावर मास्त नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. संमेलनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिक, साहित्य सरिक आले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये तुफान गर्दी आहे. परंतु, कोरोनाच्या नियमांच भंग करत अनेकांकडून मास्क वापरणे टाळल्याचे चित्र आहे.
इतर बातम्या
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; संभाजी ब्रिगेडचे कृत्य
"मुंबई में क्या रखा है?"; ममतांच्या दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्यांना राऊतांकडून 'त्या' वक्तव्याची आठवण
Pune : PMPML च्या चालकानं स्पीड ब्रेकरवर बस आदळली,प्रवाशाच्य़ा मणक्याला दुखापत ABP MAJHA