Pune Crime News: 5.27 लाखांचे अमली पदार्थ विकणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई
पुण्यातील कोंढवा परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन टांझानियन नागरिकांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.
Pune Crime News: पुण्यातील कोंढवा परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन टांझानियन नागरिकांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. 46 वर्षीय अब्दुल्ला रामदानी आणि 47 वर्षीय राजाबू हरेरे सल्लेह अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी मुंबईत अब्दुल्लावर अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल झाला होता. दोघेही उंड्री येथील रहिवासी असून ते मुळ टांझानियाचे आहेत.
अब्दुल्ला रामदानी आणि राजाबू हरेरे सल्लेह हे दोघे आरोपी वैद्यकीय व्हिसावर भारतात आला होते. मात्र पुण्यात ते अमली पदार्थाचा व्यापार करत होते. गुप्त माहितीवरून कारवाई करत कोंढवा परिसरातील धर्मवत पेट्रोल पंपाजवळ त्यांना पकडण्यात आले. आता त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपास पथकात पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, तसेच राहुल जोशी, विशाल दळवी, नितेश जाधव, योगेश मोहिते यांचा समावेश होता.
एफडीए आणि हडपसर पोलिसांनी 52 लाख रुपयांचा गुटखा केला जप्त
पुण्यातील (Pune)हडपसर पोलिस ठाण्याच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एका ट्रकमधून हैदराबादहून मुंबईकडे नेला जाणारा 52 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक (arrest) करण्यात आली होती. हा ट्रकही पोलिसांनी जप्त केला होता.
श्रीराम यादव असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव होते. त्याचे साथीदार सिडलेदत्त रेड्डी, विष्णू रेड्डी, सुशांत रे आणि दीपक कोठारी यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल सदाशिवराव गवते यांनी तक्रार दिली होती.
२९ जून रोजी गुटख्याने भरलेला ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला होता. याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला लागली आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीने हा ट्रक हडपसर येथे अडवला. ट्रकमध्ये 40 पोत्यांमध्ये 52 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला आणि पोलिसांनी तो जप्त केला, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वास डगळे यांनी सांगितले.