एक्स्प्लोर
दाभोलकरांच्या हत्येवेळी मारेकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी दोघे उपस्थित होते : सीबीआय
नरेंद्र दाभोलकर हेच आहेत का, अशी अगोदरच उपस्थित असलेल्या दोघांकडून खात्री करण्यात आली आणि नंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी गोळ्या झाडल्या, असं सीबीआयने कोर्टात सांगितलं.
![दाभोलकरांच्या हत्येवेळी मारेकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी दोघे उपस्थित होते : सीबीआय two peoples were already present where Dr Dhabholkar killed CBI in court दाभोलकरांच्या हत्येवेळी मारेकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी दोघे उपस्थित होते : सीबीआय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/10173531/Dabholkar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या पुण्यातील ज्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर झाली, त्या पुलावर नरेंद्र दाभोलकर यांना ओळखणारे दोघे आधीच पोहोचले होते. त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे पुलावर पोहोचले, अशी माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली आहे.
दाभोलकर पुलावर आले तेव्हा शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी हेच दाभोलकर आहेत का याबाबत तिथे आधीच उपस्थित असलेल्या दोघांकडून खात्री केली. खात्री होताच दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या. कळसकर आणि अंदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण हत्येच्या कटात सहभागी होते, असं सीबीआयच्या तपासात समोर आलंय.
त्या दोघांचा शोध सीबीआयने सुरु केलाय. याच गोष्टीच्या तपासासाठी शरद कळसकरची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.
वैभव राऊत आणि शरद कळसकर यांनी चार पिस्तुलांची विल्हेवाट लावली आणि तोडून ते खाडीमध्ये फेकून दिले, असंही तपासात समोर आलं आहे.
वैभव राऊत आणि शरद कळसकर 23 जुलैला रात्री वैभव राऊतच्या घरुन निघाले. त्यांच्याकडे असलेल्या चार पिस्तुलांची त्यांना विल्हेवाट लावायची होती. ती पिस्तुलं त्यांनी तोडली आणि पिस्तुलाचे तुकडे एका पुलावरुन खाडीच्या पाण्यात फेकून दिले. हे तुकडे जिथे फेकले, ती जागा ठाण्यातील कळवा पूल, वसईमधला खाडी पूल किंवा कल्याणमधील खाडी पूल यापैकी एक जागा होती. मात्र रात्रीची वेळ असल्याने या तीनपैकी नक्की कोणत्या जागी पिस्तुलाचे तुकडे टाकण्यात आले हे शरद कळसकरला आत्ता आठवत नसल्याने त्याची आणखी चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आली.
या चारपैकी एक पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेला असावा, असा सीबीआयला संशय आहे.
संबंधित बातम्या :
सचिन अंदुरेच्या कोठडीत वाढ, कळसकरसोबत समोरासमोर चौकशी होणार
दाभोलकर-गौरी लंकेश हत्येसाठी एकच पिस्तूल, सीबीआयचा दावा
दाभोलकर, गौरी लंकेश हत्या: चिखलेतील जंगलात आरोपींना ट्रेनिंग?
डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्याला अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)