एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुकाराम मुंढेंनी PMPML च्या 158 बसचालकांना घरी पाठवलं!
तुकाराम मुंढे हे आपल्या कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. पुण्यात आल्यापासूनही त्यांनी वाहतूक व्यवस्थेत सुधारणेच्या दृष्टीने मोठी पावले उचलली.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सतत गैरहजर राहणाऱ्या बसचालकांवर मोठी कारवाई केली आहे. एकूण 158 बसचालकांना बडतर्फ करत, घरचा रस्ता दाखवला आहे.
तुकाराम मुंढे हे आपल्या कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. पुण्यात आल्यापासूनही त्यांनी वाहतूक व्यवस्थेत सुधारणेच्या दृष्टीने मोठी पावले उचलली.
तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 4 मे 2016 रोजी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामाविरोधात धडक कारवाई करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात पालिकेत एकमताने अविश्वास ठराव मंजूर झाला.
त्यानंतर त्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. सध्या पीएमपीएमएलमधीलही त्यांच्या कामाचा धडाका नेहमीच चर्चेत असतो.
यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं. 2012 मध्ये जालन्यातही ते जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. गतिमान प्रशासन आणि पारदर्शी कामासाठी ते प्रसिद्ध आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement