Pune New Year: 31 डिसेंबरला पुण्यातील फर्ग्यूसन रस्ता अन् कॅम्प परिसरात वाहतुकीत बदल, ही बातमी वाचून घराबाहेर पडा!
पुणे कॅम्प आणि डेक्कन परिसरात नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने 31 डिसेंबर 2023 आणि 1 जानेवारी 2024 या कालावधीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
Pune New Year : पुणे कॅम्प आणि डेक्कन परिसरात (Pune news)नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने 31 डिसेंबर 2023 आणि 1 जानेवारी 2024 या कालावधीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील लष्कर (कॅम्प) परिसरातील महात्मा गांधी रोडवर तसेच फर्ग्युसन कॉलेज रोडवर पुणेकर गर्दी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. हे टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही तात्पुरते बदल केले जात आहेत. 31 डिसेंबर सध्याकाळी 5 वाजेपासून ही वाहतूक बदलण्यात येणार आहे.
फर्ग्युसन कॉलेज आणि जंगली महाराज रोड ट्रॅफिक डायव्हर्जन 31 डिसेंबर 2023
फर्ग्युसन कॉलेज : कोथरूड आणि कर्वे रोडवरून खंडोजीबाबा चौकातून येणारी वाहने थांबवून लॉ कॉलेज रोड, प्रभात रोड, अलका टॉकीज चौकमार्गे वळविण्यात येणार आहेत.
जंगली महाराज रस्ता : जंगली महाराज रस्त्यावरून खंडोजीबाबा चौक, गुडलक चौक आणि इतर लेनमधून फर्ग्युसन कॉलेज रोडकडे येणारी वाहने झाशी राणी चौकात परिस्थितीनुसार बंद करून पुणे महानगरपालिका, ओंकारेश्वर मंदिर आणि शिवाजी रोडमार्गे वळविण्यात येणार आहेत.
पुण्यात नो व्हेईकल झोन - 31 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 ते 1 जानेवारी 2024 , पहाटे 5 वाजेपर्यंत.
फर्ग्युसन रोड ते गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेन गेट.
एम. जी. रोड 15 ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर.
दिनांक 31/12/2023 रोजी सकाळी 19.00 ते 05:00 या वेळेत मद्यप्राशन करून वाहन चालविण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
सध्याच्या ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेदरम्यान, कोविड -19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून, प्रत्येक व्यक्तीसाठी सिंगल यूज ब्लो पाईप (प्लास्टिक पाईप) वापरला जाईल. नागरिकांनी या काळात मद्यपान करून वाहन चालवू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी
एफएलडब्ल्यू-2, उच्च दर्जाची किंवा अतिउच्च दर्जाची, विदेशी मध्य विकणाऱ्या किरकोळ विक्रीच्या दुकानास 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान उघडं ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. एफएल-3 (परवाना कक्ष)च्या मदिरायलायांना पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्रीची मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत दारुच्या दुकानांना मुभा असेल. नववर्षाच्या स्वागतासाठी चालणाऱ्या थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर विरजण पडू नये म्हणून 31 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत मद्य विक्रीस परवानगी दिली आहे, तर महानगरांमध्ये पहाटे 5 वाजेपर्यंत ही परवानगी आहे. पुणे आणि मुंबईमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत मद्य विक्री होणार आहे.
इतर महत्वाची बातमी-