एक्स्प्लोर
Advertisement
पवना धरणात एकाचा, तर वळवण धरणात दोघांचा बुडून मृत्यू
पवना धरणात बुडालेल्या इंजिनियरचं शुभम वसेकर असं, तर वळवण धरणात बुडालेल्या 14 वर्षीय मुलीचं खुशी शेख आणि 15 वर्षीय मुलाचे मोईज खान अशी नावं आहेत.
पिंपरी चिंचवड : पवना धरणात बुडून एका इंजिनियरचा तर वळवण धरणात मुला-मुलीचा बुडून मृत्यू झाला. पवना धरणात बुडालेल्या इंजिनियरचं शुभम वसेकर असं, तर वळवण धरणात बुडालेल्या 14 वर्षीय मुलीचं खुशी शेख आणि 15 वर्षीय मुलाचे मोईज खान अशी नावं आहेत.
शुभम हा नुकताच बंगळुरु येथील आयटी कंपनीत रुजू झाला होता. दोन दिवसांची सुट्टी मिळाल्याने दोन मित्र आणि एका मैत्रिणीसोबत तो पवना धरण परिसरात फिरायला आला होता. तेव्हा दुपारी अडीच वाजताच्या सुमारास तो आणि आणखी एक मित्र पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे ही बुडाले. सुदैवाने मित्र बचावला मात्र शुभम बुडाला. त्याचा मृतदेह साडेचारच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळून आला.
मूळची लोणावळ्याची खुशी आणि पुण्याहून खुशीच्या घरी आलेला मोईज हे कुटुंबियांसोबत सुट्टीची मजा घ्यायला वळवण धरण परिसरात गेले होते. दुपारी साडे चारच्या सुमारास दोघे खेळण्यासाठी पाण्यात गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. दोन्ही कुटुंबियांनी डोळ्या देखत त्यांच्या मुलांना गमावलं.
लोणावळा शहर पोलिसांना दोघांची मृतदेह शोधण्यात यश आलं. तेव्हा या दोन्ही घटनांमधून धडा घेत धरण, नदी, समुद्र अशा पाण्याच्या ठिकाणी मौज-मजा करायला गेलात तर स्वतःची अन लहान मुलांची काळजी घ्यायला हवी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement