एक्स्प्लोर
पुण्यात दिवसाढवळ्या मंदिराच्या दानपेट्या चोरीला, दोघांना अटक
पुणे: पुण्यात दिवसाढवळ्या मंदिराच्या दानपेट्या चोरी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. 17 तारखेला वडगावमधल्या गणपती मंडळची दानपेटीची चोरी करणाऱ्या दोघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे.
वडगावचा राजा मंडळ परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीनं दोन्ही आरोपींना अटक केली गेली. विनायक सोनटक्के आणि व्यंकटेश कुटे अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत.
आरोपींनी याआधीही एका मंदिरात चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत या दोघांनी किती चोऱ्या केल्या आहेत. याचाही सध्या पोलीस कसून तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement