Pune Crime News: दहशत निर्माण करणाऱ्या चुहा गँगच्या म्होरक्यासह साथीदारांच्या आवळल्या मुसक्या; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
पुण्यात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चुहा गँगचाम्होरक्या तौसिफ ऊर्फ चुहा आणि त्याच्या साथीदारांच्या पुण्यातील भारती विदयापीठ पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे.
Pune Crime News: पुण्यात(Pune) मोठा दरोडा (robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या चुहा गँगचा (Chuha gang) म्होरक्या तौसिफ ऊर्फ चुहा आणि त्याच्या साथीदारांच्या पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे. ही गँग मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या गँगच्या वेळेत मुसक्या आवळल्या आहेत.
चुहा गँगचा मुख्य सूत्रधार तौसिफ चुहा हा त्याच्या साथिदारासह पुण्यातील कात्रज परिसरातील पतंगराव कदम बंगल्याच्या समोरील सच्चाई माता डोंगरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीसांनी हालचाली सुरु केल्या. वेळेत त्या ठिकाणी पोलीस पोहचले असता चुहा गँग तिथेच तळ ठोकून होती. त्यावेळी त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तौसिफ ऊर्फ चुहा जमिर सय्यद, अझरुद्दीन दिलावर शेख , ईशान निसार शेख, गणेश विजय भंडलकर, कैफ आरीफ शेख अशी या चुहा गँगमधील साथीदारांची नावे आहेत. ही गँग दरोडा टाकायच्या तयारीत असल्याने त्यांच्याजवळ दोन कोयते, मिरची पुड, लोखंडी रॉड, मोबाईल असा मुद्देमाल सापडला आहे.
ही गँग कात्रज परिसरात कायम दहशत निर्माण करण्याचं काम करतात. आतापर्यंत अनेकवेळा त्यांनी कात्रजच्या नागरिकांना त्रास दिला आहे. खंडणी, जबर चोरी आणि खुनाचा प्रयत्न करण्यासाठी त्यांच्यावर अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. यापुर्वी तौसिफ ऊर्फ चुहा जमिर सय्यद, अझरुददीन दिलावर शेख , ईशान निसार शेख, गणेश विजय भंडलकर, कैफ आरीफ शेख या सगळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही कारवाई केली होती मात्र त्यांची दहशत कायम होती. त्यामुळे आता भारतीविद्यापीठ पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुण्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहेत. त्यात दरोडा, जबर चोरी, हत्या, सायबर गुन्ह्यांचं प्रमाण जास्त आहे. रोज वेगळ्या पद्धतीचा गुन्हा समोर येतो. त्यामुळे अशा गँगवर कारवाई केल्याने नागरिकांना दिलासा मिळू शकतो.