Talathi Bharti Exam : तलाठी भरती परीक्षेत घोटाळा? विद्यार्थ्याला मिळाले 200 पैकी 214 गुण; विजय वडेट्टीवारांकडून चौकशीची मागणी
"तलाठी भरती परीक्षा" हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
पुणे : तलाठी भरती परीक्षेचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. एका विद्यार्थ्याला 200 पैकी 214 गुण मिळाले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आजपर्यंतच्या शैक्षणिक इतिहासातील हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. "तलाठी भरती परीक्षा" हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केली आहे, ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे.
ट्विटमध्ये काय म्हणाले वडेट्टीवार?
"तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत आहे. मागणी, आणि ती पण SIT चौकशीची..? आतापर्यंत या सरकारने जितक्या SIT स्थापन केल्या, त्याचे निकाल काय आले ? हे माहीत असूनही, तुमचा इतका मिळमिळीत विरोध का ? एक लिमिट मध्ये राहून विरोध करायच्या म्हणजे विरोध पण दिसेल आणि ED पण येणार नाही. असं काही आहे का ?", असं विजय वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक
तलाठी भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केला. या भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज सरकारला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सत्तेतून खाली खेचण्याची गरज असल्याचेही रोहन सुरवसे पाटील म्हणाले. रोहन सुरवसे पाटील म्हणाले, "स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेल्या ट्वीटद्वारे ही माहिती समोर आली आहे. एकाच विद्यार्थ्याला वनरक्षक परीक्षेत चोपन्न गुण मिळाले आहेत. तर, तलाठी भरती परीक्षेत दोनशे पैकी दोनशे चौदा गुण मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असोत, की सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असोत. या परीक्षांतील पारदर्शकता पूर्णपणे संपली असून, अहोरात्र मेहनत करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम शिंदे-फडणवीस-पवार सरकार करीत आहे.
विशेष तपास पथकामार्फत चौकशी करा
या नतदृष्ट सत्ताधाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हिताशी काहीही देणे घेणे नसून, वशिलेबाजी आणि पैसे घेऊन सरकारी पदे पूर्णपणे विकली जात असल्याची शक्यता आहे. संपूर्ण तलाठी भरती परीक्षेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी व्हावी. तसेच तलाठी भरती आणि वनरक्षक भरती रद्द करण्यात यावी," अशी मागणीही सुरवसे-पाटील यांनी केली आहे.
"तलाठी भरती परीक्षा" हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 7, 2024
200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत… https://t.co/GZPRip8BJ5
इतर महत्वाची बातमी-