एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune news : पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण तर 84 पूरप्रवण, आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणेनं सज्ज राहावं, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना 

पुणे जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळं सर्व संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

Pune news : हवामान विभागाने (IMD) पावसाच्या संदर्भात पुणे (Pune) जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळं सर्व संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (DR Rajesh Deshmukh) यांनी दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 गावे पूरप्रवण आहेत. हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते. 

पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 पूरप्रवण

मंगळवारपासून घाटमाथ्यावरही पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 पूरप्रवण गावे आहेत. दरडप्रवण गावात दरडी कोसळण्याची शक्यता तसेच पूरप्रवण भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. आपल्या भागात घटना घडल्यास तात्काळ नियंत्रण कक्षास कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केलं आहे . 

 प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयस्थळ सोडू नये 

सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील नियत्रंण कक्ष कार्यान्वित असल्याची दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी आपले मुख्यालयस्थळ सोडू नये. नागरिकांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा आणि वैद्यकीय उपकरणे अद्ययावत असल्याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. 

पर्यटकांची गर्दी लक्षात घेता वाहतूकीचे योग्य नियोजन करावे

मान्सूनच्या काळात विशेषत: सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता वाहतूकीचे योग्य नियोजन करावे. भोर, वेल्हा, मुळशी आणि मावळ या भागातील यंत्रणांनी  सतर्क राहावे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे नदी परिसरात पूरप्रवण गावातील नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्याची कार्यवाही करावी. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असंही जिल्हाधिकारी  म्हणाले. मुसळधार पाऊसाच्या पार्श्वभूमीवर घाटप्रवण क्षेत्रात दरडी हटविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली. यावेळी सर्व संबंधित विभागप्रमुखांनी केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने तसेच आपत्तीच्या काळात करावयाच्या नियोजनाबाबत माहिती देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीलाBharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
Embed widget