Suresh Kalmadi Passed Away: 'सबसे बडा खिलाडी'! विमानाचे पायलट अन् पुण्याच्या राजकारणाचेही, कोण होते सुरेश कलमाडी?
Suresh Kalmadi Passed Away: एकेकाळी राजकारणात दबदबा असलेले सुरेश कलमाडी अलीकडे काही वर्षांपासून राजकारणापासून फार लांब राहिले होते.

पुणे: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं आज निधन (Suresh Kalmadi Passed Away) झालं आहे.ते ८२ वर्षांचे होते. आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi Passed Away) हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांना मानणारा मोठा वर्ग होता. एकेकाळी राजकारणात दबदबा असलेले सुरेश कलमाडी अलीकडे काही वर्षांपासून राजकारणापासून फार लांब राहिले होते, अपक्ष म्हणून निवडणून आलेले कलमाडी कायमच चर्चेत असायचे.(Suresh Kalmadi Passed Away)
Suresh Kalmadi: सुरेश कलमाडी यांचा परिचय
सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १९६० मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. १९६४ ते १९७२ या काळात त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवा बजावली. त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.
भारतीय वायू सेनेत असणारे सुरेश कलमाडी ७० च्या दशकात काँग्रेसमध्ये आले होते. इतर सगळ्या नेत्यांना बाजूला सारत सुरेश कलमाडी पुणे काँग्रेसचे प्रमुख बनले होते. १९९१ नंतर पुण्यातील काँग्रेसवर त्यांच्या वरदहस्त राहिला. पुढील लोकसभा निवडणुकीत आपल्याला पुण्यातून तिकीट मिळणार नाही अशी भीती व्यक्त करत कलमाडींनी १९९७ मध्ये काँग्रेस सोडली. १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पराभव झाला. कधी काळी शरद पवार यांच्या जवळील समजले जाणारे सुरेश कलमाडी यांनी मात्र आपला पराभव शरद पवारांमुळे झाल्याचा आरोप केला.
१९९८ ची राज्यसभा निवडणूक भारतात खूप गाजली होती. कॉंग्रेसच्या मातब्बर उमेदवार राम प्रधानांचा पराभव करुन ते निवडून आले होते. १९९८ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार माजी केंद्रीय सचिव राम प्रधान सहजरित्या निवडून येतील अशी परिस्थिती असताना अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या सुरेश कलमाडींचा विजय झाले. अपक्ष असलेले सुरेश कलमाडी निवडून आल्याने तत्कालीन कॉग्रेस पक्षाध्यक्षांनी कॉग्रेस आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. तर याच निवडणुकीनंतर शरद पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली.
दरम्यान राम प्रधान हे राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या जवळचे समजले जात.महायकमांडच्या जवळचा उमेदवार पडल्याचा ठपका शरद पवार यांच्यावर ठेवण्यात आला. यामुळे पराभवामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात दरी वाढण्यास हे देखील कारण असल्याचं सांगितलं जातं
सलग ३० वर्षे सुरेश कलमाडी खासदार राहिले होते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात सुरेश कलमाडी रेल्वेमंत्री म्हणून काम केले होते. २०१० पासून सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा सुरू झाली. २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणात सुरेश कलमाडी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. यावेळी विरोधकांनी सुरेश कलमाडी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणी कलमाडी यांना ९ महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला. माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचा पुण्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणातही एकेकाळी दबदबा होता. पुण्यात अतिशय लोकप्रिय ठरलेल्या पुणे फेस्टिवलचं ते 32 वर्षांपासून ते आयोजन करत होते.
सुरेश कलमाडींनी १९६५ साली पाकिस्तान आणि १९७१ च्या बांग्लादेशच्या म्हणजे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानाविरुद्धच्या युद्धात भारतीय वायूसेनेचे पायलट म्हणून कर्तव्य बजावलं होतं. पुण्यातील NDA (नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी) मधून इंडियन एअर फोर्समध्ये १९६० मध्ये दाखल झाले होते. स्कॉड्रन लीडर म्हणून ते निवृत्त झाले होते. १९७४ मध्ये त्यांनी लवकर निवृत्ती घेतली. त्यांनी महाराष्ट्र युवा कॉंग्रेसची धुरा सांभाळली होती. तसंच ते संजय गांधीचे निकवर्तीय मानले जातं. १९८२ साली ते राज्यसभा खासदार झाले. भारतीय खेळांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यसाठी केलेले प्रयत्नांची वाहवा झाली. मात्र पुढे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भारतीय ऑलंपिक असोसिएशनचं पद सोडावं लागलं होतं. त्यानंतर ते राजकारणापासून लांब राहिले.























