Pune News: विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा घुमणार ‘आवाज’; ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवरील मर्यादेला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती
Pune News: ‘गणेशोत्सव काळातील मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांमधील वादकांच्या संख्येवर मर्यादा असावी. ही संख्या ३० पेक्षा जास्त असू नये,’ अशी याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल करण्यात आली होती.
पुणे: गणेशोत्सात ढोल ताशा पथकामध्ये 30 पेक्षा जास्त वादक नसावे असा आदेश हरित लवादाने दिला होता. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा मोठा आवाज सर्वत्र घुमणार आहे.ढोल ताशा पथकामध्ये 30 पेक्षा जास्त वादक नसावे असा आदेश हरित लवादाने दिला होता या आदेशाला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. हरित लवादाने गेल्या 30 ऑगस्ट रोजी वादकाच्या संख्ये संदर्भात आदेश दिला होता. त्यावर भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर काल सुनावणी पार पडली.सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीशांनी असे होऊ शकत नाही असे म्हटले.सोबतच हरित लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. (Supreme Court Stays NGT Order Grants Relief to Punes Dhol Tasha Players)
‘गणेशोत्सव काळातील मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांमधील वादकांच्या संख्येवर मर्यादा असावी. ही संख्या ३० पेक्षा जास्त असू नये,’ अशी याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी वेळी ढोल-ताशा पथकातील वादकांची संख्या ३० पेक्षा जास्त असू नये, असा आदेश न्यायाधिकरणाने दिला होता. ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी पथकातील वादकांची संख्या ३० पेक्षा जास्त होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असंही त्यांनी म्हटलं होतं. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागण्यात आली होती. त्यावर काल (गुरुवारी) सुनावणी पार पडली. त्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या आदेशांना स्थगिती देताना राज्य शासनालाही नोटीस बजावली आहे.
‘लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सव काळातील ढोल ताशा-पथक यांना शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ सांस्कृतिक महत्त्व असून संख्येला बंधन घातल्यास ढोल-ताशा पथकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे,’ ही बाब वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ढोल-ताशा पुण्याच्या हृदयात आहे, असे निरीक्षण नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता ढोल-ताशा पथकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात पुणे आणि मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक सार्वजनिक गणेश मंडळांची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने निघते. या मिरवणुकीचे ढोल-ताशा पथके हेच मुख्य आकर्षण असते. वेगवेगळी पथके उत्सवाचा मोठा भाग बनली आहेत.
आपल्या याचिकेत त्यांनी ढोल-ताशा पथकांतील वादकांच्या संख्येवर मर्यादा नसल्याने भाविकांना त्रास होतो. त्यामुळे त्यावर मर्यादा घालावी अशी मागणी केली होती. त्यानंतर पथकातील वादकांच्या संख्येवर बंधन घालण्याचे आदेश दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या आदेशामुळे राज्यभरात ढोल-ताशा पथकांच्या संख्येवरील मर्यादा दूर झाली आहे.