Sunil Tatkare on Ajit Pawar : अजित पवार की जय पवार, बारामतीतून उमेदवारी कुणाला, सुनील तटकरेंनी प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर करुन टाकलं!
Sunil Tatkare : अजित पवार यांनी जर बारामतीमधून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यास त्यांचे पुत्र जय पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशी सुद्धा चर्चा सुरू आहे.
Sunil Tatkare on Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभवला सामोरे जावे लागल्यानंतर कात टाकून कामाला लागलेल्या आणि गुलाबी जॅकेटमधून जनसन्मान यात्रा काढत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा रोखठोक भाष्य करत बारामतीमधून निवडणूक लढवण्यात कोणताही रस नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या थेट वक्तव्याने बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणूक अजितदादांच्या नेतृत्वात लढली जाईल
अजित पवार यांनी जर बारामतीमधून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यास त्यांचे पुत्र जय पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. दरम्यान या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक अजितदादांच्या नेतृत्वात लढली जाईल. जेव्हा नेतृत्वामध्ये निवडणूक लढवल्या जातात तेव्हा नेतृत्वाने निवडणूक लढवावी असं अभिप्रेत असल्याचं सुनील तटकरे म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की जय पवार यांच्या उमेदवारीवर कार्यकर्त्याने जनता योग्य तो निर्णय घेईल. आगामी विधानसभा निवडणूक दादांच्या नेतृत्वामध्येच महायुतीकडून लढवल्या जातील. त्यामुळे एखाद्या नेतृत्वात जेव्हा निवडणूक लढवली जाते तेव्हा त्या नेतृत्वाने सुद्धा निवडणूक लढवावं असं अभिप्रेत असतं. आम्ही दादांच्या नेतृत्वामध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असं तटकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की जनसमान यात्रेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता दादा विधिमंडळात असावेत असेच सर्वजण सांगत असल्याचं तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांनी केलेले वक्तव्य कोणत्या अनुषंगाने हे मला माहित नाही. आज त्यांची भेट होणार असून भेट झाल्यानंतर आम्ही तुमच्याशी बोलू असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. मात्र संसदीय बोर्ड आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून दादा विधानसभेच्या रिंगणात असतील असं माझं मत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. महाराष्ट्राचे नेतृत्व दादांनी करावे अशी महाराष्ट्राची इच्छा असल्याचे ते म्हणाले. ते करत असताना निवडणूक लढणं हा भाग आलाच असं म्हणत त्यांनी दादा निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील, असे स्पष्टपणे सांगितलं. मात्र त्यांनी कुठेही बारामतीचा उल्लेख केला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या