एक्स्प्लोर

Sunetra Pawar : उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवारांकडून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव; बारामती विकासाचे दिलं क्रेडिट

बारामातीचा विकास हा अजित पवाराच्या ध्येय धोरणांनी झाला आणि त्याच्या कल्पनेतून झाला असल्याचा विशेष उल्लेख सुनेत्रा पवारांनी आपल्या भाषणात केला आहे.  

पुणे : बारामती लोकसभा मतदार (Baramati Loksabha election ) संघातून माहयुतीकडून (Mahayuti) सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) अजित पवारांच्या (Ajit Pawar) विकास कामाचं कौतुक केलं. बारामातीचा विकास हा अजित पवाराच्या ध्येय धोरणांनी झाला आणि त्याच्या कल्पनेतून झाला असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला आहे. घडाळ्याला दिलेलं मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेलं मत आहे. मोदींना मत म्हणजेच विकासाला मत याचाही आवर्जून उल्लेख सुनेत्रा पवारांनी आपल्या भाषणात केला आहे. 

सुनेत्रा पवार म्हणाल्या की,  गेल्या 10 वर्षांपासून जीव झोकून पंतप्रधान मोदी काम करत आहेत. भारतात झालेला विकास ही नरेंद्र मोदींची किमया आहे. मात्र बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया आहे. अजित पवारांनी विकासाच्या यात्रेत जाण्याचा निर्णय घेतला आहे विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजित पवार आहेत.

अजित पवारांमुळेच बारामतीचा विकास

गेल्या 10 वर्षात बारामतीत झालेली विकास कामे राज्य आणि केंद्रांच्या माध्यमातून झाली आहेत. गेल्या 25 वर्षात शिक्षण, आरोग्य क्षेत्रात काम केलं आहे. बारामतीचा विकास झपाट्याने झाला आहे. बारामती एक विकासाचं मॉडेल म्हणून समोर आलं आहे. हा विकास फक्त अजित पवारांच्या दूरदृष्टीमुळे झाला आहे. अजित पवार जनतेच्या मनातील लोकनेते आहेत. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्यांची क्षमता राज्यातील जनतेला माहिती आहे तर बारामतीतील जनतेने हा ध्यास अनुभवला आहे. 

भारताचा विकास म्हणजे मोदींची किमया

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा चांगला विकास केला आहे. प्रत्येक क्षेत्रात मोदींनी आपली विशेष कामगिरी बजावली आहे. मोदी देशासाठी जीव झोकून काम करत आहेत. जनतेच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास आहे. देशातील प्रत्येक वर्गातील लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. देशातील रस्ते, मंगलयान, चांद्रयान सारख्या मोहिमा ही मोदींची किमया आहे. त्यामुळे जनतेच्या मनात मोदी आणि मोदीच आहे, असंही त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, प्रफुल्ल पटेल, विजय शिवतारे उपस्थित आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar: सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार दगडूशेठच्या मंदिरात, म्हणाले मोठा विजय...

Pune Loksabha election : सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर अन् अमोल कोल्हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार; कोणते नेते उपस्थित राहणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Menstrual Leaves : महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?
शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
कुरघोडी, कावा अन् मंबाजीची नांगी..अजय पूरकरचा खलनायकी अंदाज! ‘अभंग तुकाराम’मध्ये चाहत्यांसाठी वेगळाच  ट्विस्ट
कुरघोडी, कावा अन् मंबाजीची नांगी..अजय पूरकरचा खलनायकी अंदाज! ‘अभंग तुकाराम’मध्ये चाहत्यांसाठी वेगळाच ट्विस्ट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Land Dispute| Chandrapur: Meshram कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारला, जमिनीचा वाद कायम
Maharashtra Power Strike | वीज कंपन्यांचा ७२ तासांचा संप, सरकारकडून MESMA लागू
Pune ATS Raids: कोंढव्यासह 8 ठिकाणी छापेमारी, 19 संशयितांची चौकशी
OBC Protest | मुंबईत OBC समाजाचा एल्गार, उद्या Nagpur मध्येही मोर्चा
Balasaheb Thackeray Controversy|बाळासाहेबांच्या 'Handprints' आणि Swiss Bank पैशांवरून राजकारण तापले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Menstrual Leaves : महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?
शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
कुरघोडी, कावा अन् मंबाजीची नांगी..अजय पूरकरचा खलनायकी अंदाज! ‘अभंग तुकाराम’मध्ये चाहत्यांसाठी वेगळाच  ट्विस्ट
कुरघोडी, कावा अन् मंबाजीची नांगी..अजय पूरकरचा खलनायकी अंदाज! ‘अभंग तुकाराम’मध्ये चाहत्यांसाठी वेगळाच ट्विस्ट
Mohammed Shami: टीम इंडियातून पत्ता जवळपास कट झाल्यात जमा, मोहम्मद शमी पहिल्यांदाच मनातील बोलला! म्हणाला, ‘त्यांना वाटत असेल तर..’
टीम इंडियातून पत्ता जवळपास कट झाल्यात जमा, मोहम्मद शमी पहिल्यांदाच मनातील बोलला! म्हणाला, ‘त्यांना वाटत असेल तर..’
Chirag Paswan : माझ्यावरही जबाबदारी... चिराग पासवान यांनी भाजपचं टेन्शन वाढवलं, बिहारमध्ये जागावाटपातील गोंधळ कायम
माझ्यावरही जबाबदारी... चिराग पासवान यांनी भाजपचं टेन्शन वाढवलं, बिहारमध्ये जागावाटपातील गोंधळ कायम
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीसाठी प्रशांत किशोरांच्या पहिल्याच यादीत एनडीए, महाआघाडीसह राजकीय जाणकारांना सुद्धा चकवा!
बिहार निवडणुकीसाठी प्रशांत किशोरांच्या पहिल्याच यादीत एनडीए, महाआघाडीसह राजकीय जाणकारांना सुद्धा चकवा!
Solapur : शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक बँकेतून लंपास, अखेर बँक ऑफ महाराष्ट्राकडून पोलीस तक्रार दाखल
शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक बँकेतून लंपास, अखेर बँक ऑफ महाराष्ट्राकडून पोलीस तक्रार दाखल
Embed widget