Pune News: पुणे जिल्हा न्यायालयाची कौतुकास्पद कामगिरी; अखेर तृतीयपंथी व्यक्तींसाठी सुरु केले स्वच्छतागृह
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने जिल्हा न्यायालयात तृतीयपंथींयांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात आली आहे.
Pune News: पुण्यात सगळीकडे सध्या तृतीय पंथीयांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने जिल्हा न्यायालयात तृतीयपंथींयांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात आली आहे. तृतीयपंथींयांच्या हक्क व अधिकाराबाबत जनजागृती व्हावी तसेच सामान्य नागरिकांमध्ये त्यांना स्वीकारण्याची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने कार्य सुरु आहे.
स्वच्छतागृहाच्या प्रस्तावाला मंजूरी
जिल्हा न्यायालयात विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरादरम्यान तृतीयपंथीय समूहासाठी स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याबाबत समस्या मांडण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय देशमुख यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सादर केलेल्या स्वच्छतागृहाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. जिल्हा न्यायालयातील नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही सुविधा करण्यात आली आहे.
देशात तृतीयपंथीयांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहे. अनेक क्षेत्रात त्यांच्यासाठी कशा पद्धतीने कार्य करता येईल याचं नियोजन सुरु आहे. वकील, डॉक्टर आणि खान्देशात तर नगरसेवक म्हणूनसुद्धा तृतीयपंथीयांना निवडून दिलं जात आहे. मात्र काही भागात अजूनही त्यांची अवहेलना केली जाते. त्यांना निच वागणूक दिली जाते. त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क प्रत्येक विभागाने द्यायला हवा. मात्र त्याच्या स्वच्छता गृहांचा प्रश्न सगळ्यात मोठा आणि महत्वाचा होता. पुणे न्यायालयाने केलेल्या या मदतीने अनेर तृतीयपंथीयांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सुरक्षा आता तृतीयपंथीयांच्या ही हाती
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने तृतीयपंथीना मुख्य प्रवाहात आणण्याच ठरवलं आहे. त्या दिशेने पाऊल टाकत तृतीपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून निवड करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) तृतीय लिंग व्यक्तींना सुरक्षा रक्षक म्हणून स्वीकारले आहे. त्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात आले आहे. शहरात पाच हजारांपेक्षा अधिक तृतीपंथी आहेत. बहुतांश तृतीयपंथ्यांकडे नागरिक वेगळ्यान नजरेने पाहतात. दुसरीकडे त्यांना सन्माने जगता, वावरत यावं म्हणून महानगरपालिकेने तृतीयपंथीसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज त्यांना रुजू करुन घेत समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.