एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हेल माशाच्या उलटीला कोट्यवधींची किंमत, तस्करी करणाऱ्याला अटक
व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधीची किंमत आहे. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.
पुणे : 'उलटी' म्हटलं की प्रत्येकालाच किळस वाटते, पण व्हेल माशाच्या उलटीसाठी (Whale Fish Vomit) मात्र कोट्यवधींची रक्कम आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) मोजली जाते. कारण या उलटीपासून महागडी सुगंधी द्रव्य (Perfume) तयार केली जातात. कोट्यवधींची किंमत असल्यामुळेच या उल्टीची तस्करी (Smuggling of whale vomit) देखील केली जाते. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) याच उलटीची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी 550 ग्रॅम इतकी व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. या उल्टीची किंमत जवळपास 1 कोटी इतकी आहे.
व्हेल माशाची उल्टी यावेळी पोलिसांनी जप्त केलीच आहे. सोबतच एक पुरातन वस्तू देखील जप्त करण्यात आली आहे. या गोष्टीची किंमतही बरीच आहे. दरम्यान या प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी जॉन सुनील साठे आणि अजित हुकुमचंद बागमार या दोन आरोपींना अटक केली आहे. सुनील साठेने अजित हुकुमचंद बागमार यांच्याकडून पिंपरी-चिंचवडमध्ये एका व्यापाराला ही व्हेल माशाची उलटी विकण्यास आणली होती असं पोलीस तपासातून समोर आलं आहे.
सापळा रचून पोलिसांची कारवाई
संबधित आरोपी हे पिंपरी-चिंचवड शहरात ग्राहक शोधत होते. गुन्हे शाखेला याबाबतची माहिती मिळाली. ज्यानंतर पोलिसच ग्राहकांच्या रुपात गेले. ज्यानंतर त्यांनी सापळा रचून आरोपींना ताब्याच घेतलं. यावेळी व्हेल माशाच्या कोट्यवधींच्या उल्टीसह एक पुरातन वस्तूही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा-
- हेअर ट्रान्सप्लांटच्या नावाखाली पुण्यात 300 जणांची फसवणूक, बोगस डॉक्टरसह दोघांना अटक
- ओमायक्रॉनचे संकट; पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतले 'हे' निर्णय
- Ajit Pawar : सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका; अजित पवारांचा शेतकऱ्यांचा सल्ला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement