एक्स्प्लोर

धक्कादायक! पुण्यात RTO अधिकाऱ्यानेच दोघांना उडवले; उपचाराचा खर्च देतो म्हणत आता हात झटकले

पुणे सोलापूर महामार्गावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक देऊन भीषण अपघाताची घटना घडली होती.

पुणे : पुण्यातील अपघातांची मालिका काही गेल्या संपता संपत नाही. कधी बड्या बापांची पोरं सर्वसामान्यांना दारुच्या नशेत उडवतात. तर, कधी प्रशासकीय खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या डोक्यातही आपल्या खुर्चीची हवा दिसून येते. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात (Accident) प्रकरणामुळे पुणे (Pune) पोलीस खडबडून जागे झाले आहे. वाहतूक व्यवस्था आणि मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र, एका आरटीओ (RTO) अधिकाऱ्यानेच दुचाकीला धडक देऊन केलल्या अपघातात अद्यापही कारवाई न झाल्यानंतर अपघातातील जखमींकडून संताप व्यक्त होत आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक देऊन भीषण अपघाताची घटना घडली होती. वरळीतील हिट अँड रन प्रकरण देशभरात चर्चेत असतानाच, हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी  हद्दीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने चुकीच्या दिशेने भरधाव वेगात गाडी चालवून दुचाकीला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोरा आला आहे. कुंजीरवाडी गावातील चौकात बुधवारी 3 जुलै रोजी हा अपघात घडला असून या अपघाताचे cctv फुटेज समोर आले आहे. संभाजी गावडे असं प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याचे नाव असून निखिल पवार आणि विकास राठोड असे अपघातात जखमी झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. 

विशेष बाब म्हणजे संभाजी गावडे यांनी दोन्ही जखमींच्या नातेवाईकांना उपचाराचा खर्च देण्याचे आमिष दाखवून, अपघाताचा गुन्हा लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल होऊ दिला नव्हता. मात्र , दोन्ही रुग्णांच्या शस्त्रक्रियांचा खर्च देण्यास साहेबांनी ऐनवेळी हात वर केल्याने, दोन्ही रुग्णांना उपचार संपल्यावरही मागील तीन दिवसापासुन रुग्णालयातच खितपत पडावे लागल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

या अपघातात दोन तरुण जखमी झाले आहेत 

संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त ज्या दिवशी काही रस्ते बंद होते त्याच दिवशी हा अपघात घडल्याची माहिती आहे. संबंधित आर.टी.ओ. आधिकारी हे उरुळी कांचनच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. आरटीओ अधिकारी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जात असताना समोरुन आलेल्या दुचाकीला या गाडीने जोरात धडक दिली होती. त्यामध्ये, निखिल पवार व विकास राठोड हे दोघेही जखमी झाले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh : सोनं गहाण ठेवलं, टीका सहन केली पण भारताला संकटातून वाचवलं, मनमोहन सिंह यांच्याकडून आर्थिक सुधारणांची पायाभरणी 
कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांनी सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग स्वीकरला अन् चित्र बदललं   
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
Manmohan Singh Death: जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 27 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :27 डिसेंबर 2024 : ABP MajhaEVM  Politics Special Report : ईव्हीएमचा 'आशय', वक्तव्यांचा विषय; EVM वरुन सुप्रिया सुळेंचा यू टर्न?ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 27 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh : सोनं गहाण ठेवलं, टीका सहन केली पण भारताला संकटातून वाचवलं, मनमोहन सिंह यांच्याकडून आर्थिक सुधारणांची पायाभरणी 
कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांनी सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग स्वीकरला अन् चित्र बदललं   
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
Manmohan Singh Death: जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
Embed widget