एक्स्प्लोर

Prashant Jagtap: शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मेट्रोच्या रूळावर आंदोलन, कार्यकर्त्याचं थेट पक्षातून निलंबन; शहराध्यक्षांनी सांगितलं नेमकं कारण

Prashant Jagtap: आंदोलनानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे अॅक्शन मोडवरती आले आहेत. मेट्रो रुळावर आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या आंदोलकांची पार्टीतून तात्काळ हकालपट्टी करणार असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, विविध मागण्यासाठी कार्यकर्ते मेट्रोच्या रूळावर उतरले आहेत. तरुणांना रोजगार मेळावा यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पुण्यातल्या पुणे महानगरपालिका मेट्रो स्थानकामधील मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्यात आल आहे. या आंदोलनामुळे गेल्या एक तासापासून मेट्रो ही खोळंबली आहे. पोलीस या आंदोलनकर्त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करतायेत यासाठी आणखीन पोलीस बळ देखील बोलवण्यात आलं आहे. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे सगळे कार्यकर्ते मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्यात येत आहे. मेट्रोमध्ये तरुणांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी शरद पवार गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाकडून पुणे महानगरपालिकेच्या जवळील मेट्रो स्टेशन च्या ट्रॅकवर उभा राहून आंदोलन करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत आहे. या आंदोलनानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे अॅक्शन मोडवरती आले आहेत. मेट्रो रुळावर आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या आंदोलकांची पार्टीतून तात्काळ हकालपट्टी करणार असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष नरेंद्र पावटेकरांसह काही कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल आहे

काय म्हणाले शहराध्यक्ष प्रशांत जगताप?

याबबात माहिती देताना शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पक्षाला विश्वासात न घेताच हे स्टंटबाजीचं आंदोलन परस्पर केलं होतं. आंदोलकांनी पोलिसांवरही हात उचलल्याचा आंदोलकांवर आरोप आहे. या घटनेनंतर आंदोलनात असणाऱ्या कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नरेंद्र पावटेकर असं या स्टंटबाज आंदोलकाचं नाव असल्याचं देखी जगताप यांनी सांगितलं आहे.

आज पुणे मेट्रो परिसरात नरेंद्र पावटेकर नावाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं हा कार्यकर्ता तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून आमच्या पक्षात आला आहे. मागच्या तीन महिन्यात तो पक्षात कुठेही सक्रिय नाही. आज त्यांनी ज्या आंदोलन केलेला आहे त्याचा आणि पक्षाचा काहीच संबंध नाही. त्याने पक्षाला विचारून किंवा पक्षाला सांगून हे आंदोलन केलेले नाही. त्यामुळे आज जे काही आंदोलन करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे काही नुकसान झाले आहे किंवा पोलिसांची वाद झाला आहे प्रशासनासोबत वाद झाला आहे याचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी काही संबंध नाही. हे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासोबत चुकीच्या पद्धतीने वाद घातले आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे, मी नरेंद्र पावटेकर या कार्यकर्त्याच्या हकालपट्टी करत आहे. ती करत असताना मी सांगू इच्छितो, पक्षाला सांगून किंवा पक्षाची परवानगी घेऊन कार्यकर्ता आंदोलन करेल तरच ते आंदोलन अधिकृत समजण्यात यावं, आजचा आंदोलन हे पक्षाचं आंदोलन नाही, या चुकीच्या कृतीची पक्षपाठ राखण करणार नाही, या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो यासंदर्भात नरेंद्र पावटेकर याची हकालपट्टी करतो, असेही प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केला आहे

नरेंद्र पावटेकर यांची पक्षातून हकलपट्टी संदर्भात....

उपरोक्त विषयास अनुसरून, नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कुठल्याच आंदोलनात व कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही.अशा परिस्थितीमध्ये आज त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे त्याचबरोबर एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे या गोष्टी केल्या, निश्चितच या सर्व गोष्टी निषेधार्य आहेत.आजचे त्यांचे आंदोलन ही वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, आणि एकूणच पुणेकरांची आडवणूक करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही.त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे, असं प्रशांत जगताप यांनी जाहीर केलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget