शरद मोहोळ हत्याप्रकरणात मोठी अपडेट, गणेश मारणे, विठ्ठल शेलारांसह 16 जणांवर मोक्का
Sharad Mohol Murder case : गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शरद मोहेळ हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) लावण्यात आला आहे.
पुणे : गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शरद मोहेळ हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) लावण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहे. पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत Pune Police MCOCA Action (मोक्का) गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. 5 जानेवारी 2024 रोजी कोथरुडमध्ये मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडत शरद मोहोळ याचा खून केला होता. त्यानंतर पुण्यात खळबळ माजली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्याचाच भाग म्हणून पुणे पोलिसांकडून आज 16 जणांविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी कुणाविरोधात मोक्का लावला ?
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्येप्रकरणी आतापर्यंत जवळपास 24 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मोक्का कायद्यांतर्गत कारवाई -
पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणात कसून तपास सुरु केला. या तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. पोलीस आयुक्तांनी सर्व कागदपत्रे पडताळून आरोपींवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे करत आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.